बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कधी वेळ मिळालाच नाही”, लग्नाच्या ११ वर्षात पहिल्यांदाच ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीने साजरी केली वटपौर्णिमा, म्हणाली, “सात फेरे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 11, 2025 | 1:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dhanashri Kadgaonkar Video

"कधी वेळ मिळालाच नाही", लग्नाच्या ११ वर्षात पहिल्यांदाच 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीने साजरी केली वटपौर्णिमा, म्हणाली, "सात फेरे…"

Dhanashri Kadgaonkar Video : ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमा काल साजरी करण्यात आली. यंदाची वटपौर्णिमा अनेक अभिनेत्रींनींही उत्साहात साजरी केली. सोशल मीडियावर या अभिनेत्रींच्या वटपौर्णिमा स्पेशल व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसले. यंदाच्या या वटपौर्णिमेला अनेक नवीन लग्न झालेल्या अभिनेत्रींनीं सहभाग घेतला. रेश्मा शिंदे, शिवानी सोनार, अंकिता वालावलकर, दिव्या पुगांवकर, वैष्णवी कल्याणकर या अभिनेत्रींनी त्यांची पहिली वटपौर्णिमा अगदी थाटामाटात साजरी केली. तर याशिवाय काही अभिनेत्रींनी शूटिंगच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून सेटवरच वटपौर्णिमा साजरी केली. यादरम्यान, मालिकाविश्वातील एका अभिनेत्रीने साजरी केलेली वटपौर्णिमा लक्ष वेधून घेत आहे.

तब्बल लग्नाच्या ११ वर्षानंतर या अभिनेत्रीने पहिल्यांदाच वटपौर्णिमा साजरी केली. याबाबतचा तिने खुलासा केला आहे. ज्याने सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे लागून राहिल्या आहेत. ही अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगांवकर. धनश्री काडगांवकरने आजवर अनेक मराठी मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सोशल मीडियावरही धनश्री बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

आणखी वाचा – वर्षभरापूर्वीच वडिलांचे कर्करोगाने निधन अन् आता अभिनेत्रीलाही ब्रेस्ट कॅन्सर, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा कठीण काळ, लेकही राहते दूर…

View this post on Instagram

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri)

आता अभिनेत्रीने तिच्या लग्नानंतरच्या साजऱ्या केलेल्या पहिल्या वटपौर्णिमेचा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्रीने लग्नाच्या ११ वर्षांनंतर पहिल्यांदाच ही वटपौर्णिमा साजरी केली. अभिनेत्रीने अगदी मराठमोळ्या लूकमध्ये वडाच्या पूजेसाठी हजेरी लावली. यावेळी तिने हिरव्या रंगाची काठपदरची साडी, नाकात नथ परिधान करत पारंपरिक लूक केला होता. अभिनेत्रीने सांगितलं की, शूटींगमुळे तिला वटपौर्णिमेची पूजा करता आली नव्हती. यंदा तिच्याकडे ही संधी येताच तिने अगदी मनापासून वटपौर्णिमा साजरी केली.

आणखी वाचा – सहा महिन्यांनी देवोलीना भट्टाचार्जीने दाखविला लेकाचा चेहरा, हुबेहूब आईसारखाच दिसतो आणि…; लूक पाहून नेटकरी हैराण

हा व्हिडीओ शेअर करत धनश्री म्हणाली, “लग्न झाल्यापासून खऱ्या आयुष्यात वटपौर्णिमा कधी केलीच नाही. तसा कधी वेळच मिळाला नाही. हा पण मी केलेल्या प्रत्येक मालिकेमध्ये अगदी आवर्जून नटून-थटून ही पूजा केली. म्हणलं, चला या वर्षी मार्गदर्शनाला आई पण आहे तर करुया. खऱ्या आयुष्यात याचे १०० शॉट्स घ्यायचे नसतात. सात म्हणजे सातच फेरे. फोटो आणि व्हिडीओसाठी काही कमी जास्त नाही. त्यामुळे तेवढ्यात जितकं फुटेज मिळालं तितकंच. तर खऱ्या आयुष्यातील ही माझी पहिली वटपौर्णिमा. दुर्वेश हे तुझ्यासाठी. आता पुढील सात जन्म तुला मला सहन करावं लागणार आहे”.

Tags: dhanashri kadgaonkarmarathi actressmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
 Partho Ghosh Funeral Video

सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या अंतिम संस्काराला बॉलिवूड कलाकारांनी फिरवली पाठ, एकहीजण आला नाही, स्मशानभूमीत एकटेच…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.