बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. सामाजिक भान जपणारे, गरीब, लहान मुलांना मदत होऊ शकेल अशा अनुषंगाने ते सोशल मीडिया अकाऊंटद्वारे विविध व्हिडीओ पोस्ट करतात. अनुपम यांच्या वागणूकीमधूनच त्यांना सामाजिक जाण असल्याचे समजून येते. त्यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी रस्त्यावर कंगवा विकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पोस्ट केला. तो व्हिडीओ पाहून अनुपम यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होता आहे. (Actor anupam kher Instagram post)
अनुपम खेर मुंबईच्या रस्त्यावरुन जात असताना रस्त्याच्या कडेला एक वृद्ध गृहस्थ कंगवा विकत असतात. तो व्यक्ती अनुपम यांना ओळखत असल्याचे सांगतो आणि कंगवा घेण्याचा आग्रह करतो. त्यानंतर अनुपम यांनी विचारपूस केली असता त्यांचे नाव राजू असून आज वाढदिवस असल्याचेदेखील सांगतो. हे ऐकून अनुपम त्या व्यक्तीला २०० रुपये देऊ करतात. त्यानंतर या पैशांमध्ये मी माझे सर्व कंगवे विकतो असे अनुपम यांना सांगतो आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुंदर असे हास्य पाहायला मिळते. या दरम्याने अनुपम आणि राजूमधील झालेला संवाद हा फारच भावनात्मक असल्याचे पाहायला मिळालं. वांद्रेपासून राजू सर्व ठिकाणी पायी प्रवास करून कंगवा विक्रीचे काम करतात. मेहनत करून पैसे कमावतात. हे ऐकून अनुपम अधिक भावुक होतात आणि वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याला २०० रुपयांची नोट देऊ करतात. राजू यांच्या आग्रहाखातर कंगवादेखील विकत घेतात.
हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद केल्यानंतर अनुपम इन्स्टाग्रामवर लिहितात की, ” ‘BALD AND BEAUTIFUL’ – मुंबईतील एक मजेशीर किस्सा! राजू हा मुंबईतील रस्त्यावर कंगवा विकण्याचं काम करतो. खरं तर मला त्याच्याकडून कंगवा विकत घेण्याचं कोणतंही कारण नव्हतं. मात्र त्याचा आज वाढदिवस असल्यानं मला त्याचे मन मोडता आले नाही. त्यानिमित्तानं मी त्याच्याकडून कंगवा खरेदी केला. त्याची सुरुवात चांगली होईल मला याची खात्री आहे”.
पुढे ते लिहितात की, “मला माहिती आहे की, त्यानं आजवर त्याच्या आयुष्यात खूप चांगले दिवस पाहिले आहेत. राजूच्या चेहऱ्यावरील हसू हे मला सकारात्मक प्रेरणा देणारं आहे. मला तुम्हालाही सांगायचे आहे की, तुम्ही जर त्याच्याकडे गेलात तर कंगवा नक्की खरेदी करा. तुमच्या डोक्यावर केसं आहेत किंवा नाही यानं काहीही फरक पडत नाही. तो त्याच्या व्यक्तिमत्त्वानं तुम्हाला जिंकून घेईल एवढं मात्र नक्की. मी त्याच्याकडून एक कंगवा खरेदी केला आणि त्याला त्या कंगव्यासाठी ४०० रुपये दिले. त्यामुळे त्याच्यावर जो आनंद होता तो माझ्यासाठी फारच महत्वाचा होता. असे अनुमप यांनी त्या पोस्टमध्ये म्हटले आहे”.
अनुपम खेर यांच्या या पोस्टमुळे त्यांचे कौतुक होत आहे. चाहत्यांकडूनदेखील राजूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत. अनुपम यांच्या कृतीमुळे मेहनत करणाऱ्यांना सन्मान हा मिळतोच तसेच मेहनतीमुळे चेहऱ्यावर आलेले हास्य हे लाखमोलाचे असते हा संदेश मिळत आहे.