गेल्या काही दिवसांपासून कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरच्या घरी लगीनघाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अंकिताने बिग बॉस मध्ये जायच्या आधी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर बिग बॉस मधून बाहेर येताच तिने तिचे प्रेम जाहीर केले. कुणाल भगत हा तिच्या आयुष्याचा साथीदार असल्याचे तिने म्हटलं होतं. शिवाय लवकरच दोघे लग्न करणार असल्याचेही समोर आले होते. अशातच आता त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. (Ankita Walawalkar pre-wedding rituals started)
अंकिताने तिच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा करताच तिचे अनेक चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत होते आणि अखेर तो क्षण आला आहे. अंकिता व कुणाल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. कुणाल भगतच्या घरी लग्नाआधीच्या विधींची सुरुवात झाली आहे. या विधीचा खास व्हिडीओ त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे. शिवाय या स्टोरीमध्ये त्याने होणारी बायको अंकिता वालावलकरला टॅगही केलं आहे आणि “झाली सुरुवात” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – तीन लग्नांनंतर ६६व्या वर्षी चौथ्यांदा बोहोल्यावर चढणार सुप्रसिद्ध बॉलिवूड गायक, म्हणाले, “पुन्हा लग्न करणं…”
तर हीच स्टोरी पुन्हा रीशेअर करत अंकिताने “नवरा आला वेशीपाशी” असं लिहिलं आहे. कुणालने शेअर केलेली ही स्टोरी कोकणातील लग्नाआधीची पारंपरिक विधी आहे. ज्यात शास्त्रवत पूजा करुन नवरदेवाच्या डोक्यावरुन एक वस्त्र धरले जाते. याच पारंपरिक विधीपासून अंकिता-कुणाल यांच्या लग्नाला सुरुवात झाली आहे. याआधी दोघांनी त्यांच्या लग्नाची पत्रिका गावच्या कुलदैवतेला दाखवून केली होती. त्यामुळे अंकिता-कुणाल आपल्या लग्नात परंपरेला अधिक महत्त्व देत असल्याचे दिसून येते आहे.
आणखी वाचा – 08 February Horoscope : नव्या वस्तूंच्या खरेदीसाठी शनिवारचा दिवस शुभ, प्रत्येक कामात मिळेल यश, जाणून घ्या…
दरम्यान, अंकिता व कुणाल यांनी नुकतीच आपल्या प्री वेडिंगची एक झलक चाहत्यांबरोबर शेअर केली होती. प्री वेडिंगची झलक दाखवणारा एक खास व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये दोघे खेळताना आणि एकमेकांचा हात हातात घेऊन समुद्रकिनारी चालताना आणि बोटीतून फिरताना दिसत आहेत. हे रोमँटिक फोटोशूट सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये पार पडले आहे. अशातच आता लवकरच यांचे लग्न पार पडणार आहे