बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विकी कौशलने कतरीना कैफची नाना पाटेकरांशी केली तुलना?, म्हणाला, “कंट्रोल उदय…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 8, 2025 | 10:21 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vicky Kaushal on Katrina Kaif

छावा फेम अभिनेता विकी कौशलने पत्नी कतरिनाबरोबरच्या नात्याबद्दल केलं भाष्य

आपल्या अभिनयामुळे लोकांमध्ये एक खास ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या कलाकारांच्या यादीत बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचे नाव अग्रगण्य आहे. विकीने अभिनेत्री कतरीना कैफबरोबर विवाहगाठ बांधली आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ हे इंडस्ट्रीतील एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडते. अभिनेता सध्या त्याच्या आगामी छावा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्याने त्याची पत्नी कतरिनाबरोबरच्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. अभिनेत्याने पत्नी कतरीनाची नाना पाटेकरांशी तुला केली आहे. तसंच अभिनेता पत्नीला नाना पाटेकरांच्या एका प्रसिद्ध संवादाने सुद्धा हाक मारतो. (Vicky Kaushal on Katrina Kaif)

पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, एका कार्यक्रमात चाहत्याने त्याला विचारले की, “त्याला त्याच्या पत्नीचे कोणते चित्रपट आवडतात?”. याला उत्तर देताना, अभिनेत्याने ‘सिंग इज किंग’ आणि ‘वेलकम’ अशी नावे घेतली. तो म्हणला की, “त्याला हे दोन्ही चित्रपट मनोरंजक वाटतात”. यापुढे विकीने खुलासा केला की, तो अनेकदा त्याच्या आवडत्या ‘वेलकम इन’ या चित्रपटामधील एक संवाद घरी कतरिनाला ऐकवतो. हा संवाद दुसरा तिसरा कुणाचा नसून प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचा प्रसिद्ध संवाद ‘कंट्रोल उदय कंट्रोल’ हा आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

आणखी वाचा – 08 February Horoscope : नव्या वस्तूंच्या खरेदीसाठी शनिवारचा दिवस शुभ, प्रत्येक कामात मिळेल यश, जाणून घ्या…

अभिनेता गंमतीने कधीकधी आपल्या पत्नीला म्हणतो, कधी कधी जेव्हा आमच्यात काही घडते तेव्हा मी तिला “कंट्रोल उदय कंट्रोल” असं म्हणतो. विकी-कतरीना यांच्या नात्याबद्दल सांगयचे झाले तर काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न केले. लग्न होईपर्यंत दोघांनीही त्यांचे नाते उघड केले नव्हते.  

आणखी वाचा – अंकिता वालावलकरची लगीनघाई, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, पहिला फोटो समोर

विकीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या आगामी ‘छावा’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी चाहते मंडळी चांगलेच उत्सुक आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना देखील आहेत. त्या १४ फेब्रुवारीला विकी कौशलचा छावा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: vicky kaushalvicky kaushal and katrina kaifVicky Kaushal on Katrina Kaif
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Next Post
Kushal Badrike Sunayana Photoshoot

बायकोसाठी फोटोग्राफर बनला कुशल बद्रिके, एका क्लिकसाठी मागे मागे फिरत राहिला अन्..; धमाल व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.