दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या भूमिकेने सर्वांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे अल्लू अर्जुन. अल्लूने आतापर्यंत अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोन वर्षापूर्वी त्याच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. आता या वर्षी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच आता अल्लू अर्जुन एका आरटीओ ऑफिसमध्ये पाहायला मिळाला. त्याचे फोटो व्हायरल झाले असून सर्वत्र चर्चा रंगली आहे. (allu arjun viral photo)
अल्लू अर्जुन सध्या ‘पुष्पा- द रुल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे त्याचे आरटीओच्या ऑफिसमधील फोटो व्हायरल झाल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे त्याला अटक केल्याच्या चर्चाना उधाण आले. पण जे फोटो व्हायरल झाले आहेत त्यामागील खरं कारण समोर आले आहे.
‘पिंकविला’च्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन खैरताबाद येथील आरटीओ ऑफिसमध्ये गेला होता. ‘पुष्पा-द रुल’ या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय ठिकाणी सीन चित्रित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना घेण्यासाठी तो तिथे गेला होता. या चित्रपटांमध्येदेखील दमदार सीन असणार आहेत. ॲक्शन सीन करण्यासाठी अभिनेत्याकडे आंतरराष्ट्रीय वाहन परवाना असणे गरजेचे आहे. त्यामुळे अल्लू अर्जुन या ऑफिसमध्ये पोहोचला आहे.
अर्जुनने नुकताच विजागचा दौरा केला होता. तेथेही त्याचे जंगी स्वागत करण्यात आले होते. तेथील सर्व फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. मिळलेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा- द रुल’ या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरदेखील एका खास भूमिकेमध्ये दिसणार आहे. पण तिची भूमिका नक्की काय असेल याबाबत मात्र कोणताही खुलासा झालेला नाही.
दरम्यान काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा-द रुल’ या दुसऱ्या भागानंतर याचा तिसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी घोषणा करण्यात आली होती. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागाने विक्रमी कमाई केली होती. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री रश्मिका मंदना दिसली होती. तसेच अभिनेता फहाद फाजील खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाचा शेवट अल्लू अर्जुन व फहादच्या मारमारीने झाला होता त्यामुळे पुढे काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.