कलाकार म्हंटल की प्रत्येकाचा असं समज असतो की त्यांचे पाय जमिनीवर नसतात.त्यांना चैनीच्या गोष्टींची सवय असते. सध्या अनेक कलाकारांचं व्हेकेशन मोडे सुरु आहे,सेलेब्रिटी परदेशात ट्रिपला जाताना पाहायला मिळत आहेत.(Akash Thosar Summer Vacction)
यात अभिनेता आकाश ठोसर ही मागे राहिलेला नाही.आकाश कायमच त्याच्या हटके अंदाजमुळे चर्चेत असतो. अशीच त्याची हि ट्रिप ही अनोखी आहे. कोणताही परदेश दौरा न करता गावा ठिकाणी आकाश त्याची सुट्टी घालवतो आहे. त्याच्या या ट्रिप चा व्हिडिओ त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून, उन्हाळ्याची सुट्टी असं कॅप्शन देत शेअर केला आहे.
पाहा आकाशची अनोखी ट्रिप (Akash Thosar Summer Vacction)
आकाशाचा हा व्हिडिओ पाहून लहानपणी शाळेतील उन्हाळयाच्या सुट्यांची आठवण होते. या व्हिडिओ मध्ये आकाशने स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवला आहे. आणि झाडाखाली बसून त्यांनी त्या जेवणाचा आनंद घेतला. आंब्याच्या झाडावर चढून आंबे काढले.नदीत पोहायला गेला अशा अनेक गोष्टी त्याने केल्या.
हे देखील वाचा ; “भर उन्हात तो थांबला,आणि..” आकाशचा असा ही एक चाहता
आकाशाचा हाच साधेपणा प्रेक्षकांना कायम भुरळ घालतो. सैराट च्या यशा नंतर आकाशने मागे वळून पाहिले नाही.दमदार यशा नंतरही आजपर्यंत आकाशचे पाय जमिनीवर आहेत. आणि असे मातीतले कलाकार प्रेक्षकांना कायम आपलेसे वाटतात.