शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तू अजून हवी होतीस…”, मालिकेत एकत्र काम करतानाच्या प्रियाबरोबरच्या आठवणी शेअर करत अभिजीत भावुक, म्हणाला, “खोटे दिलासे शेवटी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 2, 2025 | 1:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Abhijeet Khandkekar On Priya Marathe

"तू अजून हवी होतीस…", मालिकेत एकत्र काम करतानाच्या प्रियाबरोबरच्या आठवणी शेअर करत अभिजीत भावुक, म्हणाला, "खोटे दिलासे शेवटी…"

Abhijeet Khandkekar On Priya Marathe : प्रिया मराठेच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रिया कर्करोगाशी झुंज देत होती. गेल्यावर्षी तिची प्रकृती थोडीफार सुधारली होती. मात्र, त्यानंतर तिचा आजार पुन्हा बळावला. या काळात ती सोशल मीडियापासून देखील दूर असल्याचं पाहायला मिळालं. प्रियाच्या निधनाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे. तर, प्रार्थना बेहेरे, अभिजीत केळकर, शर्मिला शिंदे, अभिजीत खांडकेकर असे अनेक कलाकार प्रियाला अखेरचा निरोप देण्यासाठी तिच्या मीरारोड येथील घरी पोहोचले होते.

वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी प्रियाने जगाचा निरोप घेतला. आजारपणामुळे प्रियाने मालिकेतून देखील ब्रेक घेतला होता. ‘प्रियाची तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील भूमिका विशेष गाजली. या मालिकेत प्रिया व अभिजीत खांडकेकरची मध्यवर्ती भूमिका पाहायला मिळाली. प्रिया व अभिजीतचा ऑनस्क्रीन बॉण्ड चांगला नसला तरी ऑफस्क्रीन ते चांगले मित्र होते. प्रियाच्या निधनानंतर अभिजीतने इंस्टाग्राम अकाउंटवर भावुक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने फोटो, व्हिडीओद्वारेही आठवणी शेअर केल्या आहेत.

आणखी वाचा – “कुठून आणलीस गं ही ताकद?”, आस्ताद काळेचे प्रिया मराठेसाठी पत्र, भावुक होत म्हणाला, “आजार जडलाय हे समजल्यावर…”

View this post on Instagram

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar)

अभिजीतने इंस्टाग्रामवर भावुक पोस्ट लिहीत असं म्हटलं की, “नावाप्रमाणे सगळ्यांना प्रिय असलेली प्रिया. अजूनही खरच वाटत नाहीये की तू आता आमच्यात नाही आहेस. भावपूर्ण श्रद्धांजली, अकाली एग्झिट वगैरे शब्द तुझ्या संदर्भात वापरले जात आहेत हे मनाला पटतच नाही. आयुष्य इतकं भरभरुन जगणारी तू शेवटच्या अवघ्या दोन वर्षात काय काय सहन करुन गेलीस याची कल्पना ही करवत नाही”.

आणखी वाचा – “न चुकता गौरीच्या आरतीला यायचीस”, प्रिया मराठेच्या निधनानंतर अंकिता लोखंडे भावुक, म्हणाली, “गेल्या काहीवर्षात आजाराचा सामना केलास पण…”

पुढे त्याने असं म्हटलं, “शंतनू तू ज्या धीराने तिच्या बरोबर होतास त्याला तोड नाही. लवकर बरी होणार आहेस तू, बरी झालीस की मस्त पार्टी करु. असे आमचे खोटे दिलासे शेवटी निरर्थकच ठरले. तू नसल्याची सवय करुन घ्यावी लागणार आहे. तू अजून हवी होतीस प्रिया”. अभिजीतने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनीही भावुक कमेंट केल्या आहेत.

Tags: abhijeet khandkekarmarathi actorpriya marathe death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
 jui gadkari education

जुई गडकरी घेतेय 'या' विषयांत शिक्षण, सेटवर अभ्यास पूर्ण करताना दिसली आणि…; शिक्षण-अभिनय सांभाळताना होतेय तारांबळ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.