बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जुई गडकरी घेतेय ‘या’ विषयांत शिक्षण, सेटवर अभ्यास पूर्ण करताना दिसली आणि…; शिक्षण-अभिनय सांभाळताना होतेय तारांबळ

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 2, 2025 | 3:26 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
 jui gadkari education

जुई गडकरी घेतेय 'या' विषयांत शिक्षण, सेटवर अभ्यास पूर्ण करताना दिसली आणि…; शिक्षण-अभिनय सांभाळताना होतेय तारांबळ

 jui gadkari education : ‘ठरलं तर मग’ मालिका सुरु होऊन बराच काळ झाला असून या मालिकेने अल्पावधीतच रसिकांची मन जिंकली. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळते. आजवर या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेतील प्रत्येक पात्राने, कथानकाने एक वेगळीच जादू करत प्रसिद्धी मिळवली. या मालिकेतील सायलीचा म्हणजेच जुईचा खूप मोठा चहातावर्ग आहे. जुईने या मालिकेतून खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेआधीही जुईने अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. आणि जुईच्या प्रत्येक मालिकेने लोकप्रियता मिळवली.

सोशल मीडियावर जुई बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच जुईने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अभिनयाबरोबरच जुईने शिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. खऱ्या आयुष्यात जुई उच्च शिक्षित आहे. आणि आता ती आणखी एका विषयात मास्टर्स डिग्री संपादन करणार आहे. हा डिग्री घेण्यासाठीचा कोर्स तिने सुरु केला आहे. सेटवरच अभिनेत्री अभ्यास करताना दिसत आहे.

आणखी वाचा – “कुठून आणलीस गं ही ताकद?”, आस्ताद काळेचे प्रिया मराठेसाठी पत्र, भावुक होत म्हणाला, “आजार जडलाय हे समजल्यावर…”

जुई आता मास्टर्स इन enterpreneurship या विषयात म्हणजेच उद्योजिकतामध्ये शिक्षण घेत आहे. नवीन सुरुवात असं कॅप्शन देत अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी दिली. या स्टोरीला जुईने student life असा हॅशटॅग दिला आहे. जुई आता या विषयात पदवी संपादन करणर आहे. सेटवर बसून अभिनयाबरोबरच ती असाइनमेंट पूर्ण करताना दिसत आहे.

आणखी वाचा – “तू अजून हवी होतीस…”, मालिकेत एकत्र काम करतानाच्या प्रियाबरोबरच्या आठवणी शेअर करत अभिजीत भावुक, म्हणाला, “खोटे दिलासे शेवटी…”

जुई गडकरीने आपलं पदवीपर्यंतच शिक्षण BMM Advertising मध्ये पूर्ण केलं आहे. यानंतर जुईने पदव्युत्तर पदवी Advertising And PR या विषयात संपादन केली. याशिवाय जुईने तिचा डिप्लोमा डिजिटल मार्केटिंग विषयात पूर्ण केला आहे. आता अभिनेत्री पुन्हा एकदा नवीन सुरुवात करत Master In Entrepreneurship हा कोर्स पूर्ण करणार आहे. अभिनय व शिक्षण या दोन्ही जबाबदाऱ्या जुई अगदी उत्तमरीत्या पेलवत आहे.

Tags: jui gadkarijui gadkari educationmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Santosh Juvekar Song

'फकिरीयत'मधील 'चलो चले…' हे संतोष जुवेकरचे गाणे प्रदर्शित, भक्तिरसात बुडालेला दिसला आणि…; अभिनेत्याचा हटके लूक चर्चेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.