अभिनेत्री तेजश्री प्रधानाला छोट्या पडद्यावर प्रेक्षक मिस करत होते. पण नुकतीच तेजश्रीने एक व्हिडिओ पोस्ट करत तिच्या नवीन मालिकेची घोषणा केली. तिने दिलेल्या या बातमीमुळे चाहते खुश होते. परंतु मालिकेचं नाव काय असणार. तेजश्रीची भूमिका काय असेल. कोणत्या नायकासोबत तेजश्री पाहायला मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं मालिका कधी पासून सुरु होणार आणि कोणत्या वेळेत लागणार यांसारखे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. (tejashri pradhan new serial)
तेजश्रीच्या नव्या मालिकेचा प्रोमो आला समोर (tejashri pradhan new serial)
तर प्रेक्षकांच्या या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.’प्रेमाची गोष्ट’ हे तेजश्रीच्या नव्या मालिकेचं नाव आहे. तर मुक्ता नावाचं पात्र तेजश्री या मालिकेत साकारणार आहे.’जीवाची होतीय कायली’, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमधून घराघरात पोहचलेला अभिनेता राज हंचनाळे या मालिकेत मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.सागर च्या भूमिकेत राज पाहायला मिळणार आहे.
मुक्ताच्या घरच्यांना तिच्या लग्नाची काळजी आहे. परंतु मुक्त कधी आई होऊ शकत नाही तर सागरच्या घरच्यांना ही त्याच लग्न व्हायला हवं आहे, पंरतु त्याला अशी जोडीदार हवी आहे जी सईचा स्वीकार करेल. अशा पद्धतीचं कथानक मालिकेत पाहायला मिळणार आहे.४ सप्टेंबर पासून रात्री ८ वाजता स्टार प्रवाह वर मालिका सुरु होणार आहे. (tejashri pradhan new serial)
तर रंग माझा वेगळा हि मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असा अंदाज देखील वर्तवला जात आहे. प्रथमदर्शनी प्रोमो पाहताना ‘नकळत सारे घडले’ या मालिकेसारखी कथा असल्याचा प्रेक्षकांचा अंदाज आहे पंरतु मुक्ता आणि सागर ही नवीन जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.तसेच मालिकेतील नावीन्य हळू हळू उलगडत जाईलच.
हे देखील वाचा : मृणालची लेकीसोबत न्यूयॉर्क ट्रिप, प्रेक्षकांना येतेय मृणालची आठवण