‘बिग बॉस’चे यंदाचे १७वे पर्व संपायला आता फक्त काही दिवसच उरले आहेत. येत्या २८ जानेवारी रोजी या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. नुकत्याच झालेल्या वीकेण्ड का वार मध्ये शनिवारी आयेशा खान या घरातून बाहेर पडली आणि त्यानंतर रविवारी ईशा मालवीयचा कमी मतांमुळे या घरातील प्रवास संपला. ईशाच्या एक्सिटवेळी अभिषेक कुमार हा ढसाढसा रडताना पाहायला मिळाला. यावर त्याचे हे रडणे खोटे असल्याचे स्वतः ईशाने म्हटले आहे.
वीकेण्ड का वारमध्ये ईशा मालवीयाच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अभिषेक कुमारला अश्रू अनावर झाले. यादरम्यान ईशाने अभिषेकची माफीही मागितली होती. मात्र, शोमधून बाहेर पडल्यानंतर ईशाने अभिषेकचे अश्रू खोटे असून त्याने हे फक्त दिखाव्यासाठी केले असल्याचे तिने म्हटले आहे. ईशाने तिचे हे परखड मत कृष्णा अभिषेकच्या ‘बिग बझ’ या शोमध्ये व्यक्त केले.
Isha Being Isha !
— Truth Slayer (@TruthSlayer_24) January 22, 2024
Strong Contestant To Definitely Thi Ye, But Negative Traits Jyada The. Aur Log Ko Yahi Pasand Nahi Aata.#MunawarFaruqui #MannaraChopra #MunAra #AbhishekKumar #AnkitaLokhande #BiggBoss17 #IshaMalviya pic.twitter.com/OTZjfXDbIh
या शोमध्ये कृष्णा अभिषेकने ईशाला “तू घरातून बाहेर पडत होतीस तेव्हा अभिषेक खूप रडत होता, तर तुला काय वाटतं, तो हे खरंच रडत होता का?” असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देत ईशा असं म्हणाली की, “मला नाही वाटत त्याचे रडणे खरे होते. तो फुटेजसाठी काहीही करु शकतो. तो स्वतःला एकटं दाखवण्यासाठी सहानुभूती दाखवतो, हे मला आवडत नाही.” तसेच कृष्णा अभिषेकने पुढे तिला अभिषेकला काय सूचना देशील असं विचारले तेव्हाही ईशाने “आता ती वेळ निघून गेली आहे. आता जे चाललं आहे ते ठीक आहे.” असं म्हटलं.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात आता फक्त अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे, मुन्नवर फारुकी, विकी जैन, मनारा चोप्रा व अरुण महाशेट्टी आदी स्पर्धक उरले आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. तसेच बिग बॉस १७च्या यंदाच्या विजेतेपदाचा मान कोण पटकवणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.