Abhishek Gaonkar and Sonalee Gurav Mehendi : सध्या मनोरंजन विश्वात लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर येत आहे. नुकतंच ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदेच्या केळवणाचे फोटो समोर आले. तर कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकरही लवकरच लग्न करणार असल्याचं समोर आलं. तर ‘शिवा’ फेम अभिनेता शाल्व किंजवडेकर पुढील महिन्यात लग्न करणार आहे. कलाकारांची लगीनघाई सुरु असताना मालिकाविश्वातील आणखी एक अभिनेता विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्याच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अवघ्या दोन दिवसांत ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेता अभिषेक गांवकर बोहोल्यावर चढणार आहे.
अभिषेकने यंदाच्या गुढीपाडव्याचे औचित्य साधत साखरपुडा केला असल्याचं समोर आलं होतं. अभिषेक रील स्टार सोनाली गुरवसह सात फेरे घेणार आहे. नुकताच अभिषेकचा मेहंदी सोहळा नुकताच पार पडला आहे. याचे फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनाली व अभिषेकच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सध्या चर्चेत आले आहेत. यामध्ये सोनालीने पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस, फुलांचे दागिने असा लूक केला आहे तसेच तिच्या हातावरील सुंदर अशा नक्षीदार मेहंदीने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. तर अभिषेकने सोनालीला कॉन्ट्रास्ट असा मोरपिसी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.
आणखी वाचा – ‘शाका लाका बूम बूम’ फेम संजू अडकला लग्नबंधनात, थाटामाटात केला विवाह, व्हिडीओ व फोटो व्हायरल
अभिषेक व सोनाली यांच्या लग्नापुर्वीच्या कार्यक्रमांनाही सुरुवात झाली आहे. त्यांच्या पहिल्या केळवणाचे फोटो ही समोर आले होते. सोनाली-अभिषेकचं पहिलं केळवण रेस्टॉरंटमध्ये करण्यात आलं असल्याचं दिसलं. एका व्हिडीओमध्ये सोनाली व अभिषेक एकमेकांना केक भरवताना दिसले. सोनाली व अभिषेकच्या केळवणाचे फोटो चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळाले. यापाठोपाठ आता त्यांचे मेहंदी समारंभाचे फोटोही तुफान व्हायरल होत आहेत.
अभिषेकची होणारी पत्नी सोनाली गुरव ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व रील स्टार म्हणून घराघरांत लोकप्रिय आहे. भरपूर फॉलोवर्स असलेल्या सोनालीचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. विविध विषय रीलद्वारे मांडत ती नेहमीच चहात्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या व्हिडीओलाही मिलियन व्ह्यूज मिळालेले पाहायला मिळाले. सोशल मीडिया कंटेन्ट क्रिएटरमध्ये सोनालीचं नाव आवर्जून घेतलं जातं.