सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभि-कृतिकाची लगीनघाई! ‘लग्नाचा शॉट’चा धमाल ट्रेलर लॉँच; अभि-कृतिकाची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक खुश

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 22, 2026 | 4:58 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Lagnacha Shot Trailer Launch

‘लग्नाचा शॉट’चा धमाल ट्रेलर लॉँच

Lagnacha Shot Trailer Launch : लग्न हा केवळ एक विधी नसून आनंद, गडबड, नाती आणि अचानक घडणाऱ्या प्रसंगांची रंगतदार मेजवानी असते. हाच अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी येतोय नवा मराठी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’. ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम पारंपरिक सोहळ्यापेक्षा वेगळा ठरला. हा सोहळा एखाद्या खऱ्या लग्नघरासारखा सजवण्यात आला होता. त्यामुळे उपस्थितांना ट्रेलर पाहण्यापेक्षा जणू एखाद्या लग्नसमारंभात सहभागी झाल्याचा अनुभव मिळाला. कार्यक्रमस्थळी ढोल-ताशांचा गजर, लग्नाची लगबग आणि उत्साह सर्वत्र दिसत होता. या खास सोहळ्यात अभिनेता अभिजीत आमकर याची घोड्यावरून वरात आली, तर प्रियदर्शिनी इंदलकर पालखीतून वाजत-गाजत आली. या सगळ्या वातावरणामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला. ट्रेलर लॉन्चला लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी यांची उपस्थिती लाभली, ज्यामुळे सोहळ्याला खास आकर्षण मिळालं. संपूर्ण कार्यक्रमात लग्नाचा गोंधळ, आनंद आणि उत्साह अनुभवायला मिळत होता, जो अगदी चित्रपटाच्या संकल्पनेला साजेसा होता. ‘लग्नाचा शॉट’ हा चित्रपट लग्नाच्या गडबडीतून उलगडणाऱ्या रंजक आणि अनपेक्षित क्षणांचा अनुभव मोठ्या पडद्यावर देणार असल्याचं या ट्रेलर लॉन्चमधून स्पष्ट झालं आहे..

ट्रेलरमध्ये एका लग्नाच्या तयारीपासून सुरू होणारी गोष्ट पुढे कशी अनपेक्षित वळणं घेते, याची रंजक झलक पाहायला मिळते. चुकीचे निर्णय, नात्यांमधील गैरसमज आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ हे सगळं अगदी हलक्याफुलक्या, विनोदी शैलीत प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. अभि आणि कृतिकाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या घटनांमुळे त्यांचा प्रवास वेगळ्याच दिशेने वळतो. या प्रवासात अनेक मजेशीर प्रसंगांसोबत काही भावनिक क्षणही पाहायला मिळतात. दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणतात, ’’लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा सोहळा असतो. त्या एका दिवसासाठी अनेक स्वप्नं, अपेक्षा आणि भावना गुंफलेल्या असतात. पण अनेकदा या आनंदाच्या क्षणांमध्ये काही अनपेक्षित गोष्टी घडतात आणि संपूर्ण आयुष्याला वेगळं वळण मिळतं. ‘लग्नाचा शॉट’ची कथा अशाच अनपेक्षित प्रसंगांमधून आकाराला आली आहे. या चित्रपटातून आम्ही नुसतं हसवणारं मनोरंजन न देता, नात्यांमधील गोंधळ, गैरसमज आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रवास हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला आहे. प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन या प्रवासाचा आनंद घ्यावा आणि स्वतःला या गोष्टींशी कुठेतरी जोडून घ्यावं, अशी माझी मनापासून इच्छा आहे.” (Lagnacha Shot Trailer Launch)

आणखी वाचा – “मला १२ वाजता का बोलवलं?” O’Romeo च्या ट्रेलर लॉँचमध्ये रागातून उठून गेले नाना पाटेकर; नेमकं काय घडलं?

महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म कंपनी यांच्या सहयोगाने साकारलेल्या ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत-संगीताची धुरा प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली असून अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर, अभिजीत आमकार, प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, राजन ताम्हाणे, लीना पंडित, संजय कुलकर्णी, विजय पवार, मनोहर जाधव, संजीवनी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Lagnacha Shot Trailer Launch)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 6: राकेश-अनुश्रीमध्ये पुन्हा भांडण; राकेश बापटचा पारा चढला; म्हणाला, “माझ्याशी बोलू नकोस तू चूप…”

Tags: Lagnacha Shot Trailer Launchmarathi actormarathi actressmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
TMKOC Fame Munmun Dutta Talk On Motherhood

"मला आई व्हायचं नाही…" TMKOC फेम बबिताचं वक्तव्य, मातृत्वाबद्दल म्हणाली, "मी अजून लग्न केलेलं नाही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.