बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ चित्रपट नक्की कसा?, प्रेक्षकांनी पाहावा की नाही?, पुन्हा अपयश की…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 20, 2025 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
sitaare zameen par movie review

आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ चित्रपट नक्की कसा?, प्रेक्षकांनी पाहावा की नाही?, पुन्हा अपयश की...

‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या अपयशानंतर आमिर खान पुरता खचला होता. इतकंच काय तर त्यानंतरच्या काळात डिप्रेशनमध्ये असल्याचंही आमिरने सांगितलं होतं. मात्र पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करण्याचं त्याने ठरवलं. आता त्याचा ‘सितारे जमीन पर’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांची निराशा करणार नसल्याची आमिरला अपेक्षा आहे. ‘सितारे जमीन पर’मध्ये आमिरसह जिनिलीया देशमुखही मुख्य भूमिकेत आहे. यासाठी चित्रपटासाठी दोघांनीही बरीच मेहनत घेतली आहे. आता हा चित्रपट नक्की कसा आहे? याबाबत सोशल मीडियाद्वारे प्रेक्षक व्यक्त होत आहेत. (sitaare zameen par movie review)

चित्रपटगृहामधून बाहेर आल्यानंतर प्रेक्षकांनीही ‘सितारे जमीन पर’बाबत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. @its_CineHub ने या चित्रपटाला साडे चार स्टार दिले आहेत. चित्रपटाचं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, कथा, पटकथा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच चित्रपटामधून उत्तम संदेशही देण्यात आला आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने म्हटलं की, आमिर खानला सलाम. त्याचा अभिनय कमालीचा आहे. प्रत्येकाने बघावा असा हा चित्रपट आहे.

आणखी वाचा – “म्हातारपणातही रोमान्सची इच्छा होते आणि…”, नीना गुप्तांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, “८० वर्षाच्या स्त्रिलाही…”

SITAARE ZAMEEN PAR Movie Public Review | Hit Or Flop? Honest Talk | Sitaare Zameen Par Reaction #SitaareZameenPar #AamirKhan #GeneliaDeshmukh #geneliadsouza #review #publicreaction #public #publicopinion #publictalk #one100news #SitaareZameenParReview pic.twitter.com/9MztuohyBY

— ONE100 NEWS (@ONE100NEWS) June 19, 2025

तसेच चित्रपट पाहून आल्यानंतरही प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. ‘सितारे जमीन पर’ पाहून तुम्ही हसाल आणि रडणारही. तुमच्या मनात असलेल्या प्रश्नांवर विचार करायला भाग पाडणारा चित्रपट आहे, हा चित्रपट जेवढा भावनिक तितकाच विनोदीही आहे, हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा, अशा विविध कमेंट सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांनी केल्या आहेत. म्हणजेच पहिल्या दिवशी ‘सितारे जमीन पर’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे.

आणखी वाचा – Video : आमिर खानचा लेक सलमान खानला भेटायला येताच बॉडीगार्डने धक्का मारत बाजूला काढलं अन्…; व्हिडीओ व्हायरल

‘सितारे जमीन पर’ म्हणजे एका कोचची कथा आहे. असा कोच आहे की, ज्याने त्याच्या आयुष्यातील कोणत्याच प्रसंगाचा हिंमतीने सामना केला नाही. जेव्हा आयुष्यात अडचणी उभ्या राहतात तेव्हा तो प्रत्येक प्रसंगाला कशाप्रकारे सामोरा जातो हे सांगाणारा ‘सितारे जमीन पर’ आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन आणि कलाकारांचंही बरंच कौतुक होत आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी ठरतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: aamir khanbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Aadesh Bandekar Video

भरपवासात भिजत आदेश बांदेकरांनी केलं वारीचं सूत्रसंचालन, गर्दीत अडकलेल्या रुग्णवाहिकेचीही वाट मोकळी केली अन्…; नेटकऱ्यांकडून कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.