सोमवार, जुलै 27, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भरपवासात भिजत आदेश बांदेकरांनी केलं वारीचं सूत्रसंचालन, गर्दीत अडकलेल्या रुग्णवाहिकेचीही वाट मोकळी केली अन्…; नेटकऱ्यांकडून कौतुक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 20, 2025 | 4:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aadesh Bandekar Video

भरपवासात भिजत आदेश बांदेकरांनी केलं वारीचं सूत्रसंचालन, गर्दीत अडकलेल्या रुग्णवाहिकेचीही वाट मोकळी केली अन्…; नेटकऱ्यांकडून कौतुक

Aadesh Bandekar Video : सध्या सर्वत्र विठू नामाचा जयघोष पाहायला मिळतोय निमित्त आहे जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबा माउली यांच्या पालखी सोहळ्याचं. नुकतीच या मंगलमय सोहळ्याची सुरुवात झाली आहे. आळंदी, देहू येथे वारकरी संप्रदाय टाळ, मृदूंगासह मग्न झाले आहेत. या वारीत आनंदात रमलेले चेहरे सर्वत्र पाहायला मिळाले. विठूनामाचा या गजरात वारकऱ्यांसह मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आदेश बांदेकर देखील थिरकताना दिसले. देहू येथे सुरु असलेल्या पालखी सोहळ्यात आदेश बांदेकर टाळ मृदुगांच्या गजरात या पालखी सोहळ्यात रमून गेलेले दिसले. याची झलक त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ स्वरुपात पोस्ट केली आहे.

देहू आणि आळंदीवरुन तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माउली यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघून महाराष्ट्रभर वारीचा उत्साह सुरु झाला आहे. या उत्साहात आता कलाकार मंडळीही सामील झाले असल्याचं पाहायला मिळालं. स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांमधील कलाकार या वारींमध्ये मनोभावे सेवा करताना दिसले. स्टार प्रवाहवरदेखील ‘ माऊली महाराष्ट्राची ‘ या कार्यक्रमातून पंढरपूरच्या वारीचे क्षण अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते निर्माते आदेश बांदेकर करत असून त्यांनी देहू-आळंदीहून या प्रवासाला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – Video : आमिर खानचा लेक सलमान खानला भेटायला येताच बॉडीगार्डने धक्का मारत बाजूला काढलं अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

वारीवेळी भरपावसात रेनकोट घालून आळंदीमधील अनुभव बांदेकर सांगताना दिसत आहेत. त्याठिकाणी मुसळधार पाऊस पडत असताना हे शूटिंग करण्यात आले. आदेश म्हणाले की, “पावसाला उधाण आलं आहे. इंद्रायणी नदी आता दुथडी भरुन वाहतेय, पण जितका उत्साह अन् प्रवाह या पाण्याचा आहे, त्यापेक्षा जास्त उत्साह आणि ऊर्जा आळंदीमध्ये अनुभवयाला मिळते आहे. प्रचंड पाऊस आणि त्यामध्ये हा भक्तीरसाचा आलेला महापूर!”, असं त्यांनी म्हटलं. डोक्यावर पंढरपुरी टोपी, कपाळीं अबीर गुलाल असा आदेश बांदेकर यांचा वारकरी लूक लक्षवेधी ठरतोय.

आणखी वाचा – संजय कपूर अनंतात विलीन, पतीला शेवटचं पाहताना करिष्मा कपूरच्या डोळ्यांत पाणी, दोन्ही मुलंही ढसाढसा रडू लागली अन्…

ज्ञानेश्वर माऊलींचा ७५० वा जन्मउत्सव असल्याने, यंदाचे वर्ष आणखी खास आहे. यावेळी आळंदीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये रस्त्यावर आणि रस्त्याच्या दुतर्फा गर्दी पाहायला मिळत आहे. आणि त्या गर्दीतून एक रुग्णवाहिका वाट काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी आदेश बांदेकर, ‘ठरलं तर मग’चा अर्जुन (अभिनेता अमित भानुशाली) आणि ‘साधी माणसं’चा सत्या (अभिनेता आकाश नलावडे) यांनी त्या रुग्णवाहिकेसाठी मार्ग मोकळा करण्यास मदत केली. पावसामध्ये भिजत ही सर्व मंडळी काम करताना दिसली. चाहत्यांनी त्यांच्या या कृतीचे कौतुक केले आहे.

Tags: aadesh bandekar videoentertainmentmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Neena gupta wear bikini in bathroom

“मी बाथरुममध्ये बिकिनी घालून...”, रोमान्स करण्यावरुन नीना गुप्ता यांचं भाष्य, म्हणाल्या, “फक्त सेक्स आणि...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.