शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘एका माकडाने काढलंय दुकान’ या गाण्यावर शाहरुख खानची लेक थिरकली, सलील कुलकर्णीनी पोस्ट शेअर करत म्हणाले, “मी हसण्याच्या स्टेजला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 9, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saleel Kulkarni Post

'एका माकडाने काढलंय दुकान' या गाण्यावर शाहरुख खानची लेक थिरकली, सलील कुलकर्णीनी पोस्ट शेअर करत म्हणाले, "मी हसण्याच्या स्टेजला..."

बरेचदा कलाकारांच्या कामाचं कौतुक केलं जात तर काही वेळेला त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती देखील दिली जात नाही. यावरुन अनेक कलाकारांनी आजवर वाचा फोडली आहे. तर काहींनी याकडे दुर्लक्ष केलं आहे. लोकप्रिय मराठी गायक सलील कुलकर्णी यांच्या एका गाण्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर त्यांनी प्रतिक्रिया देत पोस्ट शेअर केली आहे. (Saleel Kulkarni Post)

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लेक सुहाना खान डान्स करतानाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये ती चक्क मराठी गाण्यावर नाचताना दिसत आहे. सलील कुलकर्णी यांनी गायलेल्या मराठी बालगीत ‘एका माकडाने काढलं दुकान’वर ती डान्स करत आहे. एका नेटकऱ्याने सुहानाच्या ‘आर्चिज’ या चित्रपटातील डान्स व्हिडीओवर हे गाणं हुबेहूब बसवलं आहे. हा व्हिडीओ पाहायला मजेशीर वाटत आहे. हा व्हिडीओ पाहून सलील कुलकर्णी यांनी एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा – बॉलिवूड सेलिब्रिटींसह मराठी अभिनेत्रीलाही राम मंदिर सोहळ्याची निमंत्रण पत्रिका, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

View this post on Instagram

A post shared by Saleel Kulkarni (@saleelkulkarniofficial)

हा व्हिडीओ शेअर करत, “‘एका माकडाने काढले दुकान, आली गिऱ्हाईके छान छान’, विंदांच्या या कवितेचं मी १९९९मध्ये गाणं केलं होतं. आत्ताची धृपद गायिका मेघना सरदार तेव्हा १०-११ वर्षांची होती, तिने हे गाणं गायलं होतं. लहान मुलांच्या अनेक पिढ्यांनी हे गाणं मनापासून ऐकलं. या गाण्याला दाद दिली. नंतर अनेक माध्यमांनी हे उथळ हिंदी भाषांतर करुन माझ्याच चालीत प्रदर्शित केलं. मी अर्थातच निषेधसुद्धा नोंदवलेला नाही. मग हळूहळू मराठीतल्या पण अनेक माध्यमांनी विंदा किंवा माझा उल्लेख न करता हे गाणं वाजवलं. त्याचा व्हिडीओ केला. पुन्हा एकदा जगभरातील मुलांनी ऐकलं, त्यांना आवडलं हे खूप आहे असा समजूतदार (खरं तर बावळट आणि आळशी) धोरण स्वीकारलं” असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – ‘आओगे जब तुम साजना’ फेम सुप्रसिद्ध गायक राशिद खान यांचे निधन, ५५व्या वर्षी कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

यापुढे त्यांनी लिहिलं आहे की, “आता काही दिवसांपूर्वी हे गाणं या धमाल एडिटिंग सह पाहायला मिळालं. ते सुद्धा व्हायरल झालं. आता तर मी निषेध वगैरे ओलांडून हसण्याच्या स्टेजला आलो आहे. विंदांच्या घरी बसून त्यांना हे गाणं ऐकवलं होतं. त्यांनी हा व्हिडीओ पाहिला असता तर ‘माझ्या मना बन दगड’ नावाची त्यांची कविता ऐकवायला त्यांना अजून एक कारण सापडले असते. तर, ‘एका माकडाने काढले दुकान’ या गाण्याचा प्रवास गमतीशीर चालू आहे. आजची छोटी मुलं सुद्धा ते गाणं ऐकात आहेत. विंदा. आपल गाणं हिट आहे” असं म्हणत या एडिट केलेल्या गाण्याचा आस्वाद घेतला आहे. या पोस्टवर कलाकारांसह नेटकऱ्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळत आहेत.

Tags: entertainmentsaleel kulkarnisaleel kulkarni instagramsaleel kulkarni post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
Next Post
Nupur Shikhare and Ira Khan Marriage

आयरा-नूपुरच्या संगीत सोहळ्यात आमिर खानसह पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव व लेक आझादने गायलं गाणं, व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.