शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मला गरज होती तेव्हा तू… होणाऱ्या नवऱ्यासाठी आमिरच्या लेकीने केलेली पोस्ट चर्चेत, Unseen Photo होतायत व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 22, 2023 | 9:10 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aamir Khan Daughter Viral Post

मला गरज होती तेव्हा तू… होणाऱ्या नवऱ्यासाठी आमिरच्या लेकीने केलेली पोस्ट चर्चेत, Unseen Photo होतायत व्हायरल

बॉलिवूड कलाकार हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. अशातच सध्या बॉलिवूडमध्येही कलाकारांचे विशेष समारंभ पार पडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या लेकीचा म्हणजेच आयरा खान हिचा साखरपुडा झाला. आयरा फिटनेस कोच नुपूर शिखरेबरोबर लवकरच लग्नबंधनात ही अडकणार आहे. आयरा व नूपुरच्या साखरपुडा सोहळ्यातील कधीही न पाहिलेले फोटोस सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Aamir Khan Daughter Viral Post)

आमिरची लेक आयरा खान नेहमीच चर्चेत असते. आयरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. तिच्या पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. अशातच अनेकदा तिला ट्रोलिंगचा ही सामना करावा लागतो. तिच्या बोल्ड कपड्यांमुळे तसेच नवऱ्याबरोबरचा रोमान्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नेटकरी तिला चांगलच ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकवतात. अशातच आयराची आणखी एक पोस्ट सध्या लक्ष वेधून घेतेय. आयराने ही पोस्ट तिच्या होणाऱ्या पतीसाठी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आयराने तिच्या साखरपुड्यातील काही खास क्षण ही शेअर केले आहेत.

आणखी वाचा – “त्यांचे आई-वडील आधीच वर गेले असतील”, ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांची सणसणीत चपराक, म्हणाल्या, “पैशांसाठी आम्ही…”

आयराच्या या पोस्टमध्ये तिने नुपूरसाठीच्या खास भावना शेअर करत म्हटलं आहे की, “माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात भारी व खास व्यक्तीला भेटलात का? त्याने माझ्या मनात आणि आयुष्यात खास स्थान निर्माण केलं आहे. बऱ्याच महिन्यांपासून मला हे लिहायचं होतं. पण आजही मला नाही वाटत की, माझ्या मनात आहे ते मी शब्दांत लिहू शकते. तू मला पुढं जाण्यासाठी मदत केली. तुझ्यामुळं मी बऱ्याच गोष्टी विसरू शकले. तू एखाद्या लहान मुलासारखी काळजी घेतली. मला गरज होती तेव्हा तू माझ्यासोबत होतास.”

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आणखी वाचा – “गाझामध्ये जर माझ्या मुलीचा जन्म झाला असता तर…”, लेकीबरोबरचा फोटो शेअर करत अस्वस्थ अवस्थेत दिसली स्वरा भास्कर, म्हणाली, “शाप घेऊन…”

आयरा व नुपूर यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपुडा सोहळा उरकला. त्यांच्या साखरपुड्याला बॉलिवूड जगतातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. लवकरच आता आयरा नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आयरा खान व नुपूर शिखरे ३ जानेवारीला कोर्ट मॅरेज करणार असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर ते राजस्थानच्या उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न करणार आहेत. हे लग्न जवळच्या मित्र परिवाराबरोबर व कुटुंबियांच्या उपस्थित करणार असल्याचं समोर आलं आहे.

Tags: aamir khanAamir Khan Daughter Ira Khan Trolldaughter ira khanentertainmentira khanira khan engagement photosira khan special postnupur shikhare
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
Saleel Kulkarni Emotional Post

"तिच्या डोळ्यातलं कौतुक आणि…", सलील कुलकर्णी यांची आईसाठी भावुक पोस्ट, लहानपणीचा फोटो शेअर करत म्हणाले, "सगळं अगदी तसंच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.