Ira Khan-Nupur Shikhare Wedding : बॉलीवूड परफेक्ट आमिर खानच्या घरी सध्या लगीनघाई सुरु असल्याच पाहायला मिळत आहे. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आमिर खानची मुलगी आयरा खान तिचा प्रियकर नुपूर शिखरे याच्यासह विवाह बंधनात अडकली. ३ जानेवारीला आयरा व नुपूर यांनी नोंदणी पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा उरकला. यावेळी त्यांनी मुंबईतील ताज एंड या आलिशान हॉटेलमध्ये त्यांचा रिसेप्शन सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी बॉलिवूड सिनेसृष्टीतील दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळालं.
आयरा व नुपूरच्या लग्नाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. लग्नापूर्वीचे विधी ही दणक्यात साजरे करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. आयरा व नुपूरच्या केळवणाचा थाट महाराष्ट्रीयन पद्धतीने घालण्यात आला होता. आयराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन केळवणाचे काही फोटो शेअर देखील केले होते. यानंतर आता उदयपूर येथील ताज अरवली या हॉटेलमध्ये आयरा व नुपूर यांचा शाही रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. त्यांच्या या शाही रिसेप्शन सोहळ्यासाठी उदयपूर येथील आलिशान हॉटेलची निवड करण्यात आली आहे.
या शाही रिसेप्शन सोहळ्यासाठी आयरा व नुपूर उदयपूर येथे रवाना झाले आहेत. या पाठोपाठ नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतला आहे आयरा व नुपूर यांच्या लग्नासाठी आमिर खान देखील उदयपूर येथे रवाना झाला आहे. राजस्थानी थाटामाटाने या लग्न सोहळ्याची रंगत वाढविली आहे. या लग्नसोहळ्यात आमिरनं त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरणरावसह हजेरी लावली आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आमिर त्याची पत्नी किरण रावसह राजस्थानी संगीतावर ठेका धरताना दिसला.
लेकीच्या लग्नासाठी आमिर खान खूप आनंदी असल्याचं या व्हिडीओमधून समोर आलं आहे. उद्या अखेर आयरा व नुपूर यांचा शाही रिसेप्शन सोहळा दणक्यात पार पडणार आहे.