मराठी कला विश्वात सध्या प्रेक्षक वर्ग हा नाटकांकडे वळलेला पाहायला मिळत आहे. रंगभूमीवर अनेक दर्जेदार नाटकं प्रेक्षकांची मन वळवण्यात तरबेज ठरत आहेत. अशातच मराठी कलाकारांची मांदियाळी असलेल्या ‘चारचौघी’ या नाटकाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवला आहे. हाउसफुल प्रयोगाचे बोर्ड प्रत्येक प्रयोगाला लागलेल्या या नाटकाने स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग कमावला आहे. ३१ वर्षांपूर्वी रंगभूमीवर ‘चारचौघी’ हे नाटक रंगभूमीवर आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा हे नाटकं नव्या टीमसह रसिक प्रेक्षकांचा ठाव घ्यायला सज्ज झालं आहे. (Parth Ketkar Wedding)
या नाटकात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे व मुक्ता बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत तसेच अभिनेता श्रेयस राजे, पार्थ केतकर ही कलाकार मंडळी या नाटकातून रंगभूमी गाजवत आहेत. या नाटकाच्या कलाकारांमधून एका कलाकाराने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. चारचौघी नाटकातील एक लोकप्रिय अभिनेता नुकताच विवाहबंधनात अडकला आहे.
अभिनेत्याच्या विवाहा समारंभाचे अनेक फोटोज, व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून पार्थ केतकर आहे. पार्थ केतकर नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. अभिनेत्याने मानसी नातूसह लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्याच्या लग्नाला चारचौघी नाटकाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. पर्ण पेठे हिने पार्थच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावरुन पोस्ट देखील केले आहेत.
अभिनेत्याच्या शाही विवाहसोहळ्यातील धमाल-मस्तीचे अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. अगदी शाही थाटामाटात व पारंपरिक अंदाजात पार्थचा लग्नसोहळा उरकला. पार्थच्या वरातीचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. यावेळी अभिनेत्याने त्याच्या कुटुंबियांसह ठेका धरलेला पाहायला मिळाला. याशिवाय पार्थच्या संगीत सोहळ्यातीलही डान्स व्हिडीओही चांगलेच व्हायरल होत आहेत. पार्थने आरतीसह रोमँटिक डान्स करत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. शिवाय दोघांनी एकत्र गाणं गात त्यांच्या संगीत सोहळा बहारदार केला.