मराठी मालिका विश्वामध्ये लेखक वेगवेगळे विषय घेऊन येत असतात. असाच वेगळा विषय घेऊन “आई कुठे काय करते” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेने सर्व प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेच्या कथे नुसार अरुंधती आणि आशुतोष यांनी लग्न गाठ बांधली असून त्यांचा नवीन संसार सुरु झाला आहे. परंतु आता या मालिकेत एक रंजक वळण आलेले पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा प्रमो आता चांगलाच चर्चेमध्ये आला आहे.(aai kuthe kay karte)
पहा ईशावरील प्रेमाबद्दल अनिश काय म्हणाला अरुंधतीला (aai kuthe kay karte)
आशुतोष चा पुतण्या अनिश आणि अरुंधतीची मुलगी इशा या दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम आहे. अनिश आणि ईशाने एकमेकांना प्रेमाची कबुली सुद्धा दिली आहे. त्या दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री असून त्या दोघांमध्ये प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. माझं अनिशवर प्रेम आहे, असं ईशाने अरुंधतीला सांगितले आहे. परंतु अद्याप अनिश अरुंधतीला काही बोलला न्हवता. आज च्या भागात अनिश अरुंधतीला ईशासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करणार आहे. त्यावर अरुंधती त्याला समजावताना दिसत आहे.

अनिश अरुंधतीला म्हणतो तुम्हाला आणि चाचूला आमचं लग्न झालेलं आवडेल ना? त्यावर अरुंधती त्याला बोलते का नाही आवडणार पण तुमच्या लग्नाला इतर जण विरोध करतील मी एक आई आहे आणि स्त्रीच्या मनावर झालेला आघात सहन होणारा नसतो. तर अनिश त्यावर बोलतो मी माझी पातळी सोडून कधीही वागणार नाही. आता घरातील सदस्य ईशा आणि अनीशच्या लग्नाला परवानगी देतील का? हे पाहणं रंजक ठरेल.(aai kuthe kay karte)
====
हे देखील वाचा – आनंदी करणार बिझनेस, राघव करेल का तिचा पुन्हा स्वीकार?
====
अरुधंतीच मन तुटल्या नंतर तिने दुसरं लग्न करणं सोप्प न्हवतं. अरुंधती ईशा ची आई असल्यामुळे तिला ईशाची काळजी वाटते.अरुंधतीला अशितोष आयुष्याचा जोडीदार म्हणून योग्य व्यक्ती भेटला असल्याने अरुंधतीला ईशासाठी सुद्धा तिची काळजी घेणारा जोडीदार भेटावा असे वाटते. अरुंधतीच लग्न ही संपूर्ण कुटुंबासाठी मोठी गोष्ट होती. मात्र आता ईशा आणि अनिश त्यांच्या लग्नाचा विषय कुटुंबासमोर आला तर ते याला कसा प्रतिसाद देतील हे सांगणं कठीण असेल.
