‘आई कुठे काय करते’ ही मालिका सोशल मीडियावर बरेचदा ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकली. मालिका सुरु झाली तेव्हापासून ही मालिका अनेकदा तिच्या कथानकामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गेली सव्वाचार वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेत नवनवीन कथानक येत असतानाच मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री झालेली पाहायला मिळत आहे. अभिनेता ऋषी सक्सेना या मालिकेत एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. मिहीर या एका शेफच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. (Aai Kuthe Kay Karte Serial Troll)
मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मिहीरची एंट्री झालेली पाहायला मिळत आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्यावर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “आता अरुंधतीचं दुसरं सॉरी तिसरं लग्न दाखवणार का?”, तर एकाने म्हटलं की, “याआधीच ३ मुलं आहेत, त्यात २ अनाथ मुली आणल्यात, आता यांचं काय मध्येच. ही मालिका संपूर्ण कुटुंबव्यवस्था खराब करत आहे. स्वत:ची मुलं सोडायची आणि बाहेरची पोरं डोक्यावर घ्यायची”.
“घटस्फोट, लफडी, दुसरं लग्न इतकं सामान्य गोष्ट झाली की ते सहजपणे दाखवणं सुरु झालं आणि आपली संस्कृती अशी नाही आहे, याच गोष्टी प्रेक्षकांना आवडत नाही बसं. अभिनेता म्हणून तू उत्तम कलाकार आहेसच”, असं म्हणत एका नेटकऱ्याने ऋषीला सुनावलं. त्यावर ऋषीने उत्तर दिलं की, “नवरा बनून नाही येणार, मग बघशील?”, त्यावरही हा चाहता म्हणाला की, “हो नक्की”.

“भाई येतोस तर ये, असं पण आम्ही त्या मालिकेला दुर्लक्षचं करत आलो आहे. पण हा दुसरा वगैरे नवरा बनून नको येऊ कुणाचा म्हणजे झालं”, त्यावर ऋषीने हसण्याचा इमोजी कमेंट केला आहे. पुढे हा चाहता म्हणाला की, “तसं नाही रे ब्रो..,गंमत म्हणून बोलत आहे, पण सर्व गोष्टी अति प्रमाणात दाखवत आहेत”, असं म्हणत उत्तर दिलं आहे.