शुक्रवार, जून 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिमानास्पद! सिद्धार्थ जाधवला ‘या’ लोकप्रिय पुरस्काराने केलं सन्मानित, पोस्ट शेअर करत म्हणाला, “तुम्ही मेहनत घेता त्यावर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 9, 2024 | 4:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
siddharth jadhav award

अभिमानास्पद! सिद्धार्थ जाधवला 'या' लोकप्रिय पुरस्काराने केलं सन्मानित, पोस्ट शेअर करत म्हणाला, "तुम्ही मेहनत घेता त्यावर..."

आजवर मराठी चित्रपटांसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा कलाकार म्हणजे सिद्धार्थ जाधव. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही सिद्धार्थने अभिनयाच्या जोरावर स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण केला. ‘अगंबाई अरेच्चा”, ‘जत्रा’, ‘साडेमाडे तीन’, ‘चांगभलं’, ‘माझा नवरा तुझी बायको’ या मराठी चित्रपटांमध्ये तर ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न’, ‘फूल थ्री धमाल’ अशा हिंदी चित्रपटामध्ये सिद्धार्थने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. (siddharth jadhav award)

सिद्धार्थ जाधवचा सोशल मीडियावर ही बऱ्यापैकी वावर असलेला पाहायला मिळतो. सोशल मीडियावरही सिद्धार्थचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या आगामी सिनेमाची चाहते मंडळी आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच सोशल मीडियावरुन सिद्धार्थने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतले आहे. ही पोस्ट सिद्धार्थने आनंदाची बातमी देत शेअर केली आहे. नुकताच सिद्धार्थला सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.

आणखी वाचा – झी मराठीच्या ‘या’ नव्या शोमध्ये संकर्षण कऱ्हाडे व अमृता खानविलकरच्या हाती परिक्षणाची धुरा, तर श्रेया बुगडेचीही महत्त्वपूर्ण भूमिका

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

सिद्धार्थला दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये ‘बालभारती’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ज्युरी पुरस्कार मिळाला. त्यामुळे याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. ही पोस्ट शेअर करत, “BEST ACTOR (JURY) बालभारती. नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या चौदाव्या ‘दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल २०२४’मध्ये आमचा सिनेमा ‘बालभारती’. यासाठी मला जुरीचं ‘बेस्ट ऍक्टर’ हे अवॉर्ड मिळालं. मनापासून आनंद होत आहे की, ‘बालभारती’ सिनेमातल्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात आहे. काम करण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेता त्यावर कोणीतरी कौतुकाची थाप देत आहे”.

आणखी वाचा – हे काय भलतंच, आधी साखरपुडा मोडला आणि…; आता ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीला लग्नाआधी व्हायचं आहे आई, म्हणाली…

पुढे त्याने असं लिहिलं आहे की, “देशभरातले सगळे रिजनल चित्रपट यात सहभागी झाले होते आणि त्यातून बालभारतीसाठी अवॉर्ड मिळणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे”, त्याने असे खास कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहतेमंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Tags: entertainmentmarathi actorsiddharth jadhavsiddharth jadhav award
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
Pooja Sawant

सासरी रमली पूजा सावंत, सासू-सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवसही दणक्यात साजरा केला अन्…; सासरच्या मंडळींच्या साधेपणाने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.