शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“रंग लावायचा हक्क फक्त आशुतोषला…”, अनिरुद्धने अरुंधतीला रंग लावताच घडलं भलतंच, सर्वांसमोर कानाखाली मारली अन्…; प्रोमो समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 4, 2024 | 10:12 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai Kuthe Kay Karte Promo

"रंग लावायचा हक्क फक्त आशुतोषला...", अनिरुद्धने अरुंधतीला रंग लावताच घडलं भलतंच, सर्वांसमोर कानाखाली मारली अन्…; प्रोमो समोर

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या एका रंजक वळणावर आली आहे. अरुंधतीचा नवा प्रवास नव्या वेळेत पाहायला मिळत असून या मालिकेला प्रेक्षक वर्ग भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका बरेचदा ट्रोलिंगची शिकारही झाली. असं असलं तरी मालिकेच्या कथानकाने मालिकेच्या प्रेक्षकांना जोडून ठेवलं आहे. सध्या मालिकेत अरुंधतीवर ओढावलेल संकट पाहायला मिळत आहे. (Aai Kuthe Kay Karte Promo)

आशुतोषचा अपघात झाल्याने अरुंधतीवर खूप मोठे संकट आलं आहे. अरुंधती आशुतोषच्या जाण्याने दुखावली असून ती या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. आशुतोषच्या मृत्यूचं खापर अरुंधतीच्या माथ्यावर फोडून सुलेखा ताईंनी अरुंधतीला घराबाहेर काढलं आहे. त्यामुळे सध्या ती देशमुखांच्या घरी राहायला आलेली पाहायला मिळतेय. मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, होळीनिमित्त देशमुखांच्या घरी धुळवड साजरी करण्यात येत आहे. यावेळी सगळेजण एकमेकांना रंग लावत असतात.

आणखी वाचा – “सहा महिन्यापूर्वी आईला गमावलं…”, ‘जीव माझा…’ फेम योगिता चव्हाण लग्नामध्ये तो प्रसंग सांगत रडू लागली अन्…; नवऱ्याचं कौतुकही केलं, सुंदर व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

मालिकेत धुळवड सुरु असताना अरुंधती बाहेर येते आणि ती आशुतोषच्या आठवणीत रमते. तितक्यात समोरुन अनिरुद्ध येतो आणि तो अरुंधतीला रंग लावून ‘हॅपी होळी अरुंधती’ असे म्हणतो. अनिरुद्ध अरुंधतीला रंग लावताच अरुंधती अनिरुद्धच्या सणसणीत कानाखाली लगावते आणि ‘रंग लावायचा हक्क फक्त आशुतोषला आहे, आणि कायम त्यांनाच राहील’ आहे असं म्हणते. त्यांनतर ती तिथून निघून घरात जाते. त्यावर सगळेजण चकित होऊन पाहू लागतात. त्यानंतर तिथे संजना येते आणि अनिरुद्धला म्हणते ‘चेहऱ्यावरचा रंग उडाला की रे तुझ्या, हॅप्पी होळी’ असं म्हणत त्याला रंग लावते.

आणखी वाचा – “याच्याबरोबर राहायचंच नाही असं ती म्हणाली अन्…”, योगेश शिरसाट यांचं मोडलं होतं लग्न, म्हणाले, “त्या भूमिकेमुळे…”

मालिकेच्या येणाऱ्या भागात अरुंधती अनिरुद्धच्या सणसणीत कानाखाली लागवताना दिसते. अनिरुद्ध याचा बदला घेणार का?, की संजना या आगीत तेल ओतण्याचे काम करणार?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.

Tags: aai kuthe kay karteAai kuthe kay karte promoentertainmentmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Subodh Bhave shared a video of his wife Manjiri enjoying in the Kashmir’s snow

Video : "तापमानात घट झाली की मनस्थितीवर परिणाम...", बर्फामध्ये बायको गाणं गात नाचताना सुबोध भावेने शूट केला व्हिडीओ, म्हणाला, "हा पुरावा..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.