बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : देशमुखांच्या घरी नवं वादळ, संजना आणि अनिरुद्धचा होणार घटस्फोट, प्रोमो पाहून वाढली उत्सुकता

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 7, 2024 | 2:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai Kuthe Kay Karte Promo

Video : देशमुखांच्या घरी नवं वादळ, संजना आणि अनिरुद्धचा होणार घटस्फोट, प्रोमो पाहून वाढली उत्सुकता

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला प्रेक्षक आता भरभरुन पसंती देत आहेत. मध्यंतरी मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांचा हिरमोड केला होता मात्र आता मालिकेच्या नव्या कथानकांने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेत अरुंधतीचा नवा प्रवास नव्या वेळेत पाहायला मिळत आहे. दुपारी अडीच वाजता ही मालिका प्रदर्शित होत असली तरी या मालिकेला दुपारच्या अडीच वाजताही प्रेक्षक तितकंच भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. (Aai Kuthe Kay Karte Promo)

सध्या मालिकेत आशुतोष केळकरचा मृत्यू दाखवण्यात आल्याने अरुंधतीवर खूप मोठं संकट ओढावलेलं पाहायला मिळत आहे. दरम्यान सुलेखाताई आशुतोषच्या मृत्यूला अरुंधतीला जबाबदार ठरवतात आणि तिला घराबाहेर काढतात. त्यावेळी कांचन अरुंधतीला स्वतःच्या घरी म्हणजेच देशमुखांच्या घरी घेऊन येते. देशमुख यांच्या घरी आल्याने अरुंधतीला थोडसं बरं वाटतं. ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते. तर एकीकडे संजनाला अरुंधती देशमुखांच्या घरी राहायला आलेली आवडलेलं नसतं.

अदिती राव हैदरी-सिद्धार्थ लवकरच अडकणार लग्नबंधनात?, अभिनेत्याने केला खुलासा, गुपचूप साखरपुडा केल्याबाबतही स्पष्टच बोलला, म्हणाला, “हा सोहळा…”

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अशातच आता मालिकेच्या नव्या प्रोमोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये होळीनिमित्त सगळेजण एकत्र जमलेले असतात. तेव्हा अरुंधती सांगते की, “मी आता इथे राहणं योग्य नाही, मी माझ्या घरी निघून जाते”, हे ऐकल्यावर कांचन, आप्पा सगळेच तिला इथे राहण्यासाठी विनवणी करतात. त्यानंतर यश सांगतो की, “पुढच्याच आठवड्यात आमचं लग्न आहे त्यामुळे तू इथेच राहा, नाहीतर मला तुझी काळजी वाटत राहील आणि माझं माझ्या लग्नात लक्ष नसेल”. यशच बोलणं ऐकून अरुंधती देशमुखांच्या घरी राहायला होकार देते. मात्र हे काही संजनाला आवडलेलं नसतं.

दिशाचा नवा डाव अन्…; पारूसमोर येणार का तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा खरा चेहरा?, मालिकेच्या कथानकला पुन्हा नवं वळण, पुढे काय घडणार?

त्यानंतर सगळेजण होळी पेटवण्यासाठी तयार असतात. इतक्यात संजना आतून डिवोर्सचे पेपर घेऊन बाहेर येते आणि अनिरुद्धला म्हणते की, “यापूर्वी आपण अनेकदा बोलून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तू मला वेळोवेळी आशा दाखवत राहिलास आणि त्यामुळे डिवोर्स घेण्याचं मी पुढे ढकलत राहिले. आता मात्र ती वेळ आलेली आहे”, असं म्हणत की संजना डिवोर्सचे पेपर अनिरुद्धच्या हातात देते. हे पाहून घरातील सगळ्याच मंडळींना खूप मोठा धक्का बसतो. आता संजना व अनिरुद्ध वेगळे होणार का?, हे मालिकेत येणाऱ्या भागात पाहणं रंजक ठरेल.

Tags: aai kuthe kay karteAai kuthe kay karte promomarathi serialstar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Next Post
Rohit sharma Emotional

कपिल शर्माच्या नव्या शोमध्ये रोहित शर्माची उपस्थिती, वर्ल्डकपची आठवण शेअर करत भावुक झाला अन्…; म्हणाला, " देशातील चाहते…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.