‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत. मालिकेत एका मागोमाग एक येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. घरकाम करणाऱ्या मुली पासून ते एका नामांकित कंपनीच्या ब्रँड अँबेसेडर पर्यंतचा पारूचा प्रवास मालिकेत पाहायला मिळत आहे. पारूने तिच्या बोलीभाषेने तिच्या स्वभावानं तिच्या देहबोलीन साऱ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. मात्र प्रेक्षकांच्या या लाडक्या पारूवर आता खूप मोठं संकट ओढावलेलं पाहायला मिळत आहे. मालिकेत सध्या पारूची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. (Paaru Serial Update)
पारूसाठी तिचे वडील स्थळ घेऊन आलेले असतात. दुबईला काम करणाऱ्या एका व्यक्तीचे हे स्थळ असतं. म्हणजेच अजयचं स्थळ पारूसाठी आलेलं असतं. अजयची व आदित्यची जेव्हापासून भेट झाली तेव्हापासून आदित्यला अजयवर थोडासा का होईना संशय हा असतोच. आदित्य पारूच्या वडिलांना एकदा बाहेर चौकशी करुन पहा असा सल्लाही देतो. तर एकीकडे अजयला दिशाने पारूचा बदला घेण्यासाठी बोलावलेलं असतं हे सत्य अजून सर्वांसमोर आलेलं नाही.
मालिकेत अजय हा पारूला घेऊन तिच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी, शॉपिंग करण्यासाठी घेऊन जातो. तर इकडे आदित्यला फॉरेनच्या कंपनीतून ब्रँड अँबेसिडरचा फोटो मागवण्यासाठी कॉल आलेला असतो. पारू किर्लोसकरांच्या घरी पोहोचू नये म्हणून दिशा अजयला पारूला पाठवू नको असं सांगते. पारूला तिथेच अडकवून ठेव असंही सांगते आणि तिचा फोनही बंद करायला लावते. दिशाच्या म्हणण्यानुसार अजय वागत असतो. तेव्हा पारू अजयकडे घरी जाण्याचा हट्ट करते. पारू हट्ट करताच अजयचा पारा चढतो आणि अजय पारूवर खूप जोरात ओरडतो. अजयचं हे वागणं पाहून पारूला आश्चर्याचा धक्काच बसतो. अजय असा नेमकं का वागतोय? हा प्रश्न पारुला पडलेला असतो.
“आजी, मालिकाविश्व अन्… प्रामाणिक मत”, प्रसाद जवादेने शेअर केला ‘पारू’ मालिकेच्या चाहतीचा खास किस्सा
अजयचं वागणं पाहून पारू उलट बोलली तर बाबांचा स्वाभिमान दुखावेल म्हणून ती उलटही बोलत नाही. मात्र पारूला अजयचं वागणं खटकलेलं असतं. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात अजयचा खरा चेहरा पारू समोर येणार का?, ब्रँड अँबेसेडरच्या कामासाठी पारू किर्लोस्करांच्या घरी पोहोचणार का?, हे सर्व पाहणं रंजक ठरणार आहे.