शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अदिती राव हैदरी-सिद्धार्थ लवकरच अडकणार लग्नबंधनात?, अभिनेत्याने केला खुलासा, गुपचूप साखरपुडा केल्याबाबतही स्पष्टच बोलला, म्हणाला, “हा सोहळा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 7, 2024 | 1:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Siddharth And Aditi Rao Hydari Wedding

अदिती राव हैदरी-सिद्धार्थ लवकरच अडकणार लग्नबंधनात?, अभिनेत्याने केला खुलासा, गुपचूप साखरपुडा केल्याबाबतही स्पष्टच बोलला, म्हणाला, "हा सोहळा…"

सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी यांनी काही दिवसांपूर्वीच तेलंगणामध्ये गुपचूप साखरपुडा सोहळा उरकला. जेव्हा अभिनेत्याने इंस्टाग्रामवर याबाबतचा खुलासा केला तेव्हा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान दोघांनी तेलंगणामध्ये लग्न केल्याची अफवाही सर्वत्र पसरली होती. ‘गलाट्टा गोल्डन स्टार्स’ या कार्यक्रमात सिद्धार्थने आदिती आणि त्याच्या साखरपुडा समारंभाबाबत मोकळेपणाने भाष्य केलं आहे. याशिवाय दोघेही केव्हा लग्नबंधनात अडकणार यावरही मौन सोडलं आहे. (Siddharth And Aditi Rao Hydari Wedding)

२७ मार्च रोजी सिद्धार्थ आणि आदिती यांचा साखरपुडा समारंभ पार पडला. दोघांनीही त्यांच्या साखरपुड्याबाबत कोणतीही घोषणा केली नव्हती. त्यामुळे दोघांनी लग्न केल्याची चर्चा रंगली. या चर्चांना पूर्णविराम देत दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्रामवर त्यांच्या अंगठीचा फोटो शेअर करत साखरपुडा केल्याचं सांगितलं. याबाबत बोलताना सिद्धार्थ म्हणाला, “अनेक लोकांनी मला विचारले की आम्ही गुपचूप साखरपुडा का केला?, कुटुंबाबरोबर एकांतात काहीतरी करणे आणि गुप्तपणे काहीतरी करणे यात खूप फरक आहे”. पुढे तो असंही म्हणाला की, “ज्यांना आम्ही आमंत्रित केले नाही त्यांना वाटते की यामागे काही रहस्य आहे, परंतु जे या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांना माहित आहे की, हा एक खासगी सोहळा होता. ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि नातेवाईकांचा समावेश होता”.

बाप-लेकीचं अनोखं नातं! श्रेयस तळपदेचं लेकीबरोबर आहे खास बॉण्डिंग, बायकोने फोटो शेअर करताच दिसली झलक

View this post on Instagram

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

सिद्धार्थला विचारण्यात आले की, “अदिती तुला केव्हा हो म्हणाली?”, यावर तो गंमतीत म्हणाला, “तिने हो म्हटलं तरी काही फरक पडत नाही”. तो म्हणाला, “तिला हो म्हणायला किती वेळ लागला हा प्रश्न विचारायलाच नको. शेवटी निकाल हो किंवा नाही असा असावा हे महत्त्वाचं. ती हो म्हणेल की नाही याची मला काळजी वाटत होती. पण सुदैवाने मी पास झालो. लग्नाची तारीख कुटुंबातील ज्येष्ठांवर अवलंबून असेल. याबाबत त्यांचं म्हणणं काय आहे, ते महत्त्वाचे ठरेल. हे शूटिंगच्या तारखेसारखे नाही की मी ठरवू शकेन, ती आयुष्यभराची तारीख आहे. त्यांनी एकदा निर्णय घेतला की लग्न योग्य वेळी होईल”.

“ प्रार्थना अधिक करा आणि…”, दीपिका पदुकोणच्या नवीन पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “तुलना करणं…”

सिद्धार्थ लवकरच शंकरच्या ‘इंडियन २’मध्ये देखील दिसणार आहे, ज्यामध्ये कमल हासन, काजल अग्रवाल आणि रकुल प्रीत सिंग यांच्याही भूमिका आहेत.

Tags: bollywood celebrityentertainmentsiddharth and aditi rao hydariSiddharth And Aditi Rao Hydari Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
aamir khan on father

“माझ्या शाळेची फी भरण्यासाठीही…”, वडिलांबद्दल बोलताना आमीर खानला रडू कोसळलं, म्हणाला, “आर्थिक परिस्थिती…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.