रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आशुतोषच्या आठवणीत अरुंधतीला अश्रू अनावर, देशमुखांचं घरही सोडणार, कसं असणार पुढचं आयुष्य?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 29, 2024 | 5:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai Kuthe Kay karte Promo

आशुतोषच्या आठवणीत अरुंधतीला अश्रू अनावर, देशमुखांचं घरही सोडणार, कसं असणार पुढचं आयुष्य?

‘आई कुठे काय करते’ मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. आशुतोष केळकरच्या मृत्यूनंतर मालिकेत एक वेगळंच वळण आलं आहे. आशुतोषच्या मृत्यूनंतर अरुंधतीला एकटेपण जाणवत आहे. अरुंधती आता आशुतोषच्या निधनाच्या धक्क्यातून सावरताना दिसत आहे. काही असलं तरी अरुंधतीला आशुतोषची आठवण आल्यावाचून राहत नाही आहे. अशातच मालिकेच्या समोर आलेल्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या प्रोमोमध्ये अप्पा अरुंधतीची काळजी व्यक्त करताना दिसत आहेत. तर सावरलेली अरुंधती अप्पांची समजूत काढताना दिसत आहे. (Aai Kuthe Kay karte Promo)

एककीकडे अरुंधती देशमुखांच्या घराकडे पाहत तिच्या भूतकाळातील आठवणीत रमते. तितक्यात तिथे अप्पा येतात आणि विचारतात, “अरुंधती अजून झोपली नाहीस का तू?”, यावर अरुंधती म्हणते, “नाही अप्पा. अलीकडे मला झोपच येत नाही. आशुतोष गेले आणि बरोबर माझी झोपही घेऊन गेले”. यावर अप्पा म्हणतात, “अरुंधती तू खूप धीराची आहेस. आग तुझ्या आयुष्याचा आलेख, चढ-उतार बघितले की खूप आश्चर्य वाटतं. प्रत्येक प्रसंगाला तू खंबीरपणे तोंड दिलं आहेस. दुसरी कुणी असती तर, केव्हाच कच खाल्ली असती”. यावर अरुंधती अप्पांना बोलते, “नाही अप्पा. मी धीराची नाही आहे. परिस्थिती माणसाला शिकवत जाते. मला आवडलं नसत का एका लयीत चालणार आयुष्य. पण माझ्या आयुष्यात चढ-उतार येत गेले. आणि रडत बसण्यापेक्षा ते माझ्या आयुष्यातले आरोह-अवरोह आहेत असं मी समजत गेले. आणि त्याचं संगीत झालं आणि लोकांना आवडू लागलं. पण आयुष्य लयबद्ध करायचं तर सगळेच स्वर धरून ठेवायची कसरत करावी लागते”.

आणखी वाचा – बायकोसह सप्तश्रृंगी गडावर पोहोचला राणादा, कुटुंबियांसह भर उन्हात दर्शन, पाठकबाईंच्या युनिक मंगळसूत्राने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

यावर अप्पा अरुंधतीच कौतुक करतात. आणि म्हणतात, “वा अरुंधती. आपण नेहमी सकारात्मक बोलावं असं म्हणतो. पण तुझ्याएवढं सकारात्मक दृष्टिकोन मी कोणाकडेही बघितला नाही. बाळा, तू पुन्हा एकदा संगीत विद्यालयात जायला लागलीस आणि तिथे तुला जगण्याची नवी उमेद मिळाली”. यावर अरुंधती म्हणाली, “गाणं माझा आत्मा आहे. आणि मी तिथे जाणं का टाळत होते तेच मला कळत नाही. यश मला तिथे घेऊन गेला आणि मला ते लक्षात आलं. गाणं नाही तर मी नाही. आता मी ठरवलंय, संगीताचे क्लासेस घ्यायचे”.

आणखी वाचा – “हाच खरा कोकणी माणूस”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा कोकणातल्या गावी जाण्यासाठी ट्रेनने प्रवास, घरही अगदी साधं, चाहते म्हणाले, “इतका साधेपणा…”

यावर अप्पा म्हणतात, “आता मला सांग यशच्या लग्नानंतर तू दुसरीकडे राहायला जाणार आहेस का?”, यावर अरुंधती होकार देते. आणि म्हणते, “नका काळजी करू अप्पा. मी लांब गेले तरी आपले संबंध काही संपनार नाहीत. मी कुठे आहे, काय करतेय ते तुम्हाला कळवत राहीन”. यावर अप्पा काळजी व्यक्त करत, “नक्की कळवत रहा. कांचनलाही तुझी काळजी वाटते. ती रात्र-रात्रभर झोपत नाही”. यावर अरुंधती अप्पांना, निश्चित राहण्यास सांगते.

Tags: aai kuthe kay karteAai Kuthe Kay Karte new Promoentertainmentmarathi serialstar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Abhijeet Khandkekar talked about his bad experience of Maziya Priyala Preet Kalena serial

कमी पैशांमध्ये काम, जेवणही नीट नाही अन्…; पहिल्या मालिकेबाबत अभिजीत खांडकेकरचा मोठा खुलासा, म्हणाला, "आम्ही गुलाम नाही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.