शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कमी पैशांमध्ये काम, जेवणही नीट नाही अन्…; पहिल्या मालिकेबाबत अभिजीत खांडकेकरचा मोठा खुलासा, म्हणाला, “आम्ही गुलाम नाही…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 29, 2024 | 6:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Abhijeet Khandkekar talked about his bad experience of Maziya Priyala Preet Kalena serial

कमी पैशांमध्ये काम, जेवणही नीट नाही अन्...; पहिल्या मालिकेबाबत अभिजीत खांडकेकरचा मोठा खुलासा, म्हणाला, "आम्ही गुलाम नाही..."

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या लोकप्रिय मालिकेमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे अभिजीत खांडकेकर. या मालिकेतील त्याच्या भूमिकेने त्याने महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकाला वेड लावले. आपल्या निरागस हास्याने व लुकमुळे अभिजीत अनेक तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला. आजही या मालिकेची व या मालिकेतील त्याच्या भूमिकेची क्रेझ काही कमी झालेली नाही. या मालिकेने अब्भिजीतला लोकप्रियता व प्रसिद्धी तर दिलीच पण त्याचबरोबर त्याच्या वाटेला काही वाईट अनुभव काही वाईट प्रसंगही आले.

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत काम करत असताना अभिजीतला काही वाईट अनुभव प्रसंगांना सामोरे जावे लागले होते. याबद्दल स्वत: अभिनेत्याने आता भाष्य केले आहे. अभिजीतने नुकतीच भार्गवी चिरमुलेच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला त्याच्या बालाजी फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसच्या अनुभवाबद्दल विचारण्यात आले. पहिल्या मालिकेदरम्यान त्याला कशी वागणूक मिळाली, याबद्दल त्याने आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar)

अभिजीतचा बालाजी फिल्म्सचा अनुभव कसा होता? असं विचारलं असता अभिजीत म्हणाला, “मी खरंतर याबद्दल बोलणं टाळतो. मी अगदी थेट बोलतो असं करण्यामध्ये वगैरे मला अजिबात रस नाही. खरं तर ही माझी पहिलीच मालिका आणि मी याबद्दल पूर्णपणे प्रॉडक्शन हाऊसला दोष देणार नाही. पण यात अनेक लोकांचा सहभाग असतो. ती माझी पाहिलीच मालिका होती, पण आता मागे वळून बघताना असं वाटतं की नाही तेव्हा काही बाबतींमध्ये फारच वाईट वागवण्यात आलं. संधी दिली असं म्हणत खूपच कमी पैशांमध्ये तेव्हा आमच्याकडून काम करून घेण्यात आलं होतं. पण तेसुद्धा ठिकच आहे आणि तो एक व्यवसायाचा भाग आहे. त्यामुळे त्याबद्दल आता रडून काही उपयोग नाही.”

आणखी वाचा – बॉक्स ऑफिसवर हिट झालेला ‘शैतान’ आता ओटीटीवर यायला सज्ज, कधी व कुठे पाहता येणार हा चित्रपट? जाणून घ्या…

यापुढे त्याने असं म्हटलं की, “त्या मालिकेने आम्हाला इतकी प्रसिद्धी मिळवून दिली. पण तरीसुद्धा अगदी लहान-सहान गोष्टींपासून जेव्हा तुम्हाला त्रास होतो तेव्हा असं वाटत की एक माणूस म्हणून चांगली वागणूक दिली पाहिजे. या क्षेत्राच्या नियमांनुसार जे काही आहे, त्यात चांगल्या पद्धतीचं जेवण आलं, चांगल्या पद्धतीची वागणूक आली, तर या अनेक गोष्टी झाल्या नाहीत. मला माहीत नाही कसं, पण माझ्यामध्ये ते धैर्य कुठून आलं मला माहीत नाही, पण त्यावेळेस मी त्या विरोधात आवाज उठवला होता.”

आणखी वाचा – “तेच तेच कंटाळवाणं”, निलेश साबळेचा नवा शो पाहून प्रेक्षकांमध्ये निराशा, ओंकार भोजने-भाऊ कदमला पाहून म्हणाले, “स्त्रियांची भूमिका…”

तसेच त्याने यापुढे “मी त्या त्या वेळेस त्यांना सुनावलं होतं. कारण आधी मला कॉर्पोरेटचा अनुभव असल्यामुळे मला माहीत होतं की, हे चुकीचं आहे. तुम्ही संधी देत आहात, तुम्ही आमच्याकडून मोठं काम करुन घेत आहात. जेणेकरुन आमचं करिअर घडेल, हे सगळं मान्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की, आम्ही कुणाचे गुलाम आहोत” असंही म्हटलं आहे..

Tags: abhijeet khandkekarmarathi entertainment newsMaziya Priyala Preet Kalena
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
30 april 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

साध्य, त्रिपुष्कर व रवियोगमुळे वृषभ, कन्या व मकर राशीच्या लोकांना आर्थिक फायदा, उद्याचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार?, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.