शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे…’मध्ये अरुंधतीच्या दुसऱ्या नवऱ्याचे निधन दाखवताच भडकले प्रेक्षक, मालिका बंद करण्याची मागणी, म्हणाले, “तिचा तिसरा नवरा आणा…”

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मार्च 7, 2024 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai Kuthe Kay Karte Promo

Aai Kuthe Kay Karte Promo

प्रेक्षकांच्या आयुष्यातील मनोरंजनाचं एक महत्वाचं साधन म्हणजे विविध वाहिन्यांवर प्रदर्शितकेल्या जाणाऱ्या मालिका. मालिकांच्या या शयर्तीत सध्या चर्चेत असलेली मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. सध्या मालिकेचा एक प्रोमो चांगलाच व्हायरल होत आहे आणि या प्रोमोवर प्रेक्षक नाराज असल्याचं देखील पाहायला मिळतंय. अनिरुद्ध बरोबर घटस्फोटानंतर अरुंधती-आशुतोष यांचा संसार सुरु झाला पण तरीही अरुंधती देशमुखांच्या घरापासून लांब गेली नाही. या नंतर मालिकेत अनेक घटना घडल्या पण त्यातील काही घटनांवर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली. आता पुन्हा एकदा मालिकेचा नवीन प्रोमो ट्रोल होताना दिसतोय.(Aai Kuthe Kay Karte Promo)

मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आशुतोषचं निधन झालं असून “त्याच्या निधनाला अरुंधती कारणीभूत आहे” असं आशुतोषच्या आईचं म्हणणं आहे आणि आशुतोषच्या आईने अरुंधतीला घरातून निघून जाण्यासही सांगितलं आहे. पुढे कांचन आई “मी माझ्या सुनेला नाही मुलीला इथून परत घेऊन जाण्यासाठी आलीये” असं म्हणत अरुंधतीला परत देशमुखांच्या घरी घेऊन जातात.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आणखी वाचा- राखी सावंतच्या पूर्वाश्रमीच्या पतीने गुपचूप उरकलं लग्न?, दुसरी पत्नीही आहे टेलिव्हिजन क्षेत्रातील अभिनेत्री

मालिकेच्या या प्रोमोवर अनेक प्रेक्षकांनी कमेंट्स करत राग व्यक्त केला आहे. प्रेक्षकांनी या प्रोमोवर “एक तरी नाते एकनिष्ठ दाखवायचे , सगळ्यांची दोन लग्न दाखवली आहेत, दोन बायका आणि दोन नवरे आता अजून त्यात काही वेगळे, सामान्य माणूस हे सर्व कार्यक्रम कुटुंबासोबत बघतात त्याचे तरी भान असावे, चांगले संस्कार दाखवले तर बरे होईल’, ‘अरुंधतीचं पुन्हा लग्न होणार का?” अशा कमेंट्स करत आपला राग व्यक्त केला आहे. तर काहींनी “काही दिवसात तिसरा नवरा येतोय म्हणा की… नवा नवरा, नवा प्रवास” अशा कमेंट्स करत मालिकेची खिल्ली उडवली आहे.(Aai Kuthe Kay Karte Promo)

आणखी वाचा- शाहरुख, सलमान व आमिर खान लग्नामध्ये जाण्यासाठी किती पैसे घेतात?, अंबानी कुटुंबियांकडून घेतले तब्बल इतके रुपये

मालिकेत येणाऱ्या या नव्या वळणासह मालिकेच्या वेळेत सुद्धा बदल करण्यात आला आहे. आई कुठे काय करते ही मालिका आता दुपारी २.३० वाजता प्रदर्शित होणार असल्याचं या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. मालिकेच्या या प्रोमोनुसार अरुंधती पुन्हा देशमुखांच्या घरी जाणार का?, अनिरुद्ध-अरुंधती पुन्हा लग्न करणार?असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. नक्की मालिकेत कोणतं वळण येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: aai kuthe kaay karteaai kuthe kaay karte updatemadhurani prabhulkarmarathi serialstar pravah
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Actor Dharmendra viral photo

नातेवाईकांच्या लग्नात नाचताना धर्मेंद्र यांना दुखापत, पायालाही मार, तिथे नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.