बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र ही सोशल मिडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असतात. ८८व्या वर्षीही ते अजूनही चित्रपटांमध्ये काम करताना दिसून येत आहेत. आपल्या आयुष्यातील लहान लहान अपडेट ते चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमतून शेअर करत असतात. ते सध्या आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची मोठी मुलगी ईशाने तिच्या पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेत असल्याची घोषणा केली. यावर त्यांनी ईशाला असे न करण्याचा सल्लाही दिला होता. (Actor Dharmendra viral photo)
काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांचा फोटो तूफान व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये त्यांचे विस्कटलेले केस, पायात बँडेज व हातात कोरडी भाकरी होती. त्यांनी पोस्ट शेअर करत लिहिले होते की, “मध्यरात्र झाली आहे मला झोप येत नाही. भूक लागली आहे. मित्रांनो, शिळी भाकरी लोण्याबरोबर खूप चविष्ट लागते. हाहाहा”. त्यांचा हा अवतार बघून चाहते हैराण झाले होते. चाहत्यांनी धर्मेंद्र यांची विचारपूस करण्यासही सुरुवात केली. त्यावर त्यांनी पायाचे हाड तुटले असल्याचे सांगितले.हे नक्की कसं घडलं याची माहिती मिळाली आहे.
पण आता ते या दुखापतीमधून ठीक होत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार ते आपले कुटुंब बॉबी देओल, सनी देओलबरोबर एका घरगुती विवाहसोहळ्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी सर्वांसमवेत डान्स करताना त्यांच्या पायाला व पाठीला दुखापत झाली. यामुळे त्यांच्या तब्येतीवर वाईट परिणाम झाला आहे.
सध्या धर्मेंद्र यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. धर्मेंद्र यांनी नुकतेच ‘तेरी बातो मे ऐसा उलझा जिया’ या चित्रपटामध्ये भूमिका साकारली होती. याआधी ते ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटातील त्यांचा शबाना आजमी यांच्याबरोबर दिलेल्या किसिंग सीनमुळे ते अधिक चर्चेत आले होते. या चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांच्या कामाचे कौतुकही करण्यात आले होते. ते आता श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘इक्किस’ या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासह दिसणार आहेत.