आई कुठे काय करते ही मालिका सातत्याने टीआरपीच्या शर्यतीत अव्व्ल स्थानावर आहे.मालिकेमध्ये वेगवेगळ्या टप्यावर अनेक ट्विस्ट पाहायला मिळतात.सध्या यशच्या आयुष्यात संकटाचे सावट आहे. गौरीच्या जाण्याने यश पूर्ण खचलेला पाहायला मिळतो आहे.(Yash Wedding)
पाहा काय घडणार आजच्या भागात(Yash Wedding)
आजच्या भागात यश अनिरुद्धला सांगतो कि तुम्ही विनापासून जरा लांब राहा तुमच्या मुले आईला कोणताही त्रास व्हायला नको. त्या नंतर अनिरुद्ध आशुतोषच्या ऑफिस मध्ये जातो तेव्हा त्याच्या कॅबिन मध्ये कोणी नसत, तेव्हा अनिरुद्ध आशोतोषच्या खुर्चीवर बसतो. तितक्यात विना आणि नितीन तिकडे येतात. अनिरुद्धला त्या खुर्चीवर बघून नितीन चिडतो.तेव्हा विना अनिरुद्धची बाजू घेते. आणि ते दोघे बाहेर निघून जातात. त्यानंतर विना अनिरुद्धजवळ त्याच कौतुक करत असते. कारण तो संजनला तिच्या करिअर मध्ये सपोर्ट करत असतो, तेवढ्यातच त्यांना संजना दिसते. विना आणि अनिरुद्ध त्याला तिला भेटतात. तेव्हा हि विना संजना जवळ अनिरुद्धच कौतुक करते.तेव्हा संजना विनाला म्हणते कि अनिरुद्ध खोटारडा आहे. हे ऐकून अनिरुद्धला राग येतो.
त्या नंतर घरी कांचन आई कोणीतरी येणार म्हणून सर्वाना तयारी करायला सांगत असते, तेव्हा चांदेकर कुटुंब त्यांच्या मुलीला घेऊन देशमुखांकडे येतात.तेव्हा कांचन आई सगळयांना त्यांची ओळख करून देते आणि यश साठी ही मुलगी तुम्हला कशी वाटते असं विचारते.गौरी नंतर यशच्या आयुष्यात प्रेमाची नवीन चाहूल येणार का? हे बघणं रंजक ठरणार आहे.(Yash Wedding)

हे देखील वाचा : ३ वर्ष लेकीपासून लांब- मधुराणीची पोस्ट चर्चेत