अनेक चित्रपट येतात आणि प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात ते त्याच्या कथेसाठी, कलाकारांच्या अभिनयासाठी आणि चित्रपटातील गाण्यांसाठी सुद्धा. असाच एक चित्रपट येत्या १६ जूनला प्रदर्शित होणार आहे त्यापूर्वी चित्रपटाच्या गाण्यांणी सगळीकडे हवा पाहायला मिळते. या चित्रपटाचं नाव आहे “आदिपुरुष”. सुरुवातीच्या काळात चित्रपटावर टीका करण्यात आली पण टीकेनंतर चित्रपटाच्या काही घटनांमध्ये बदल करण्यात आला आणि त्या नंतर चित्रपटाची काही गाणी लाँच करण्यात आली. काही क्षणातच या गाण्यांणी अनेक रेकॉर्डस् ब्रेक केले.(Ram Siya Ram)
मराठमोळ्या अजय अतुल ने गायलेल्या या गाण्यांनी प्रेक्षकांना आकर्षित केले. आणि आदिपुरुष चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची आतुरता अजून वाढली. आदिपुरुष चित्रपटातील नुकताच रिलीज झालेल्या राम सिया राम या गाण्याने देखील चांगलाच धुमाकूळ घातलाय. या गाण्याबद्दल समजातून अनेक चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत. गाण्यातील प्रभास आणि क्रितीच्या लुकच सध्या सर्वत्र कौतुक केलं जातंय.
प्रभास सोबतच या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री कीर्ती सेनॉन, अभिनेता वत्सल शेठ इत्यादी कलाकार दिसणार आहेत शिवाय मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे देखील या चित्रपटात दिसणार आहे.(Ram Siya Ram)