आई कुठे काय करते ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असलेली पाहायला मिळते.या मालिकेचं कथानक सध्या चर्चेत असून मालिकेत सध्या ईशा-अनिश यांच्या प्रेमाचा ट्रक सध्या सुरु आहे.सध्या अरुंधतीला ईशाची काळजी वाटतेय.म्हणून अरुंधतीने ईशा आणि अनिशचा साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. तर अनिरुद्धला हे सगळं मान्य नाही.अनिरुद्ध अनिश उसाच्या नात्यासाठी नकार देत आहे.पण अप्पा आणि कांचन आईच्या साथीने अरुंधती लेकीची साथ देते.यामुळे अनिरुद्ध ईशाची पाठवणी कॅनडाला करणार आहे.(arundhati isha)
तर मालिकेच्या पुढील भागाच प्रोमो समोर आला आहे ज्यात पाहायला मिळत आहे की, अनिरुद्ध अरुंधतीला ठणकावून सांगतो की, “इशा कॅनडाला जाणार”. त्यावर अरुंधती त्याला म्हणते की, “प्रेम करिअरच्या आड येतं असं का शिकवतोय आपण तिला?” अनिरुद्ध संतापतो आणि म्हणतो, “त्याच प्रेमामुळे आज ती पेपर कोरा सोडून आली आहे”. नंतर अरुंधती म्हणते, “एखादा दिवस एखाद्या विद्यार्थ्यासाठी वाईट असू शकतो”. “ठिक आहे मी एक चान्स देतोय. पण इशा समजवायला जमलं नाही तर उद्या इशा इथून जाणार हे नक्की”, असं अनिरुद्ध अरुंधतीला ठणकावून सांगतो.
हे देखील वाचा: अंकिता विकासाच्या नात्याला ५ वर्षे पूर्ण शेअर केला खास व्हिडिओ
मागच्या भागात अनिरुद्धला ईशा आणि अनिशच्या नात्याबद्दल समजल्यावर मी तुला लांब कुठे तरी पाठवेल असा अनिरुद्ध म्हणतो. पण त्यावर ईशा पळून जाण्याचा निर्णय घेते.तिच्या या वागण्यामुळे अरुंधतीने तिला साथ देण्याचा निर्णय घेतला. पण ईशा तू करिअरवर लक्ष देणार असं वचन घेतलं. तर ईशा ही परीक्षेत पेपर रिकामा ठेवून आली. यामुळे अनिरुद्ध चिडला.तर तो आता ईशाला कॅनडाला पाठवण्याचा निर्णय घेतला. पण अरुंधती या निर्णयाला विरोध करते. तर आता अनिरुद्ध ईशाला पाठवण्यासाठी काय करणार?,अरुंधती तिच्या निर्णयावर ठाम राहणार का? हे जाणून घेण्यासाठी सध्या चाहते उत्सुक झालेत.(arundhati isha)