Apurva Gore Husband : मराठी सिनेविश्वातील कलाकार मंडळी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची गुडन्यूज देताना दिसत आहेत. सध्या तर नवऱ्या मुलाचा वा नवऱ्या मुलीचा चेहरा लपवून ती व्यक्ती कोण असेल अशी पोस्ट करण्यात येते. याने साऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली पाहायला मिळते. सध्या कलाकार मंडळींमध्ये हा ट्रेंड वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांनी हा ट्रेंड फॉलो करत प्रेमाची कबुली दिली. यापाठोपाठ आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची गुडन्यूज दिली. ही अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे.
अपूर्वानं पोस्ट करत आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. ‘ठरलं’ असं कॅप्शन देत तिने ही पोस्ट शेअर केली. त्यामुळे अपूर्वानं प्रेमात पडल्याची कबुली दिली. असं असलं तरी तिनं पोस्टमध्ये त्या खास व्यक्तीचा चेहरा आणि ओळख मात्र लपवली आहे. आणि यामुळे अपूर्वाच्या आयुष्यातला तो मिस्टर परफेक्ट कोण आहे, याची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. आता या चर्चेनंतर हा खास व्यक्ती सिनेइंडस्ट्रीतलाच अभिनेता असल्याचं म्हटलं आहे.
आणखी वाचा – “पैसे थकवल्यावर कलाकार आवाज उठवू शकतो” मंदार देवस्थळी वादावर ‘एलिझाबेथ एकादशी’ फेम अभिनेत्रीचं स्पष्ट भाष्य
अपूर्वाच्या आयुष्यातील हा ‘मिस्ट्री मॅन’ दुसरा तिसरा कोणी नसून ‘शाळा’ सिनेमातील अभिनेता अंशुमन जोशी आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. त्यामुळे चाहत्यांना हा सुखद धक्का आहे. अपूर्वाने आणि अंशुमन या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं नसलं तरी अपूर्वाच्या चाहत्यांनी मात्र हे शोधून काढलं आहे. अपूर्वा आणि अंशुमन यांची जोडी नेमकी कशी जुळली याची उत्सुकता आता चाहत्यांना लागून राहिली आहे.
आणखी वाचा – रुचिता-राकेशमुळे कॅप्टन्सी टास्क रद्द?, पूर्ण घराला शिक्षा; राकेश स्पष्टच म्हणाला, “घरात मी राहणार नाही…”
अंशुमनने ‘शाळा’ या गाजलेल्या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय अंशुमन ‘फास्टर फेणे’, ‘फुंतरू’, ‘म्हैस’ आणि ‘फोटोकॉपी’ अशा हटके सिनेमात त्यानं काम केलं आहे. अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, चिंतक, चित्रलेखक, छायाचित्रकार, रसिक…. आणि बरंच काही…असं त्यानं त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर लिहिलं आहे. आता अपूर्वा अंशुमनच्या नावाची जाहीर कबुली केव्हा देणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहील आहे.





