रविवार, जून 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पहिल्या गरोदरपणात सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा झालेला गर्भपात, नवऱ्यानेही केलेलं दुर्लक्ष, म्हणाली, “तो फुटबॉल खेळायला गेला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 4, 2026 | 11:52 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Archana Puran Singh miscarriage

पहिल्या गरोदरपणात सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा झालेला गर्भपात, नवऱ्यानेही केलेलं दुर्लक्ष, म्हणाली, "तो फुटबॉल खेळायला गेला…"

Archana Puran Singh miscarriage : अर्चना पूरण सिंग आणि परमीत सेठी हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे आहे. हे दोघेही आता यूट्यूब व्हिडीओमुळे चर्चेत असलेले पाहायला मिळतात. अलीकडेच त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर ‘प्यार दोस्ती’ हा चॅट शो आणला आहे. या शोमध्ये ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसले. या चॅट शोद्वारे त्यांनी आणलेल्या नव्या एपिसोडमध्ये तिने अनप्लान्ड प्रेग्नन्सीमध्ये झालेल्या गर्भपाताबाबत आणि मुलांबद्दल भाष्य केलं. अर्चनाने सांगितले की तिचा गर्भपात झाला आहे आणि जेव्हा ती पुन्हा गर्भवती झाली तेव्हा तिला भावनिकदृष्ट्या एकटे वाटू लागले.

अर्चनाने सांगितले की, “लग्नाच्या पहिल्या चार वर्षांतच ती गरोदर राहिली होती. पण तिचा गर्भपात झाला. तिने सांगितले, “मी गरोदर होते, पण गर्भधारणा टिकली नाही. त्यावेळी मी एका चित्रपटात काम करत होतो. माझा गर्भपात झाला. हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. मला खरंच मुलं हवी होती”. तेव्हा अर्चना यांचे पती परमीत म्हणाले, “तुला एवढ्या दुःखात पाहून मला वाटले की, मला मुले नकोत. आम्ही दोघं एकत्र असल्याचा मला आनंद जास्त आहे”.

आणखी वाचा – रुचिता-राकेशमुळे कॅप्टन्सी टास्क रद्द?, पूर्ण घराला शिक्षा; राकेश स्पष्टच म्हणाला, “घरात मी राहणार नाही…”

तेव्हा अर्चना म्हणाली, “आम्ही दोघे खूप जवळ होतो आणि इतर कोणासाठीही जागा नव्हती. मग मीच परमीतला सांगितले की, मूल आमच्यात बाहेरचे नसणार आहेत. ते आपलेच असणार आहेत”. परमीतने सांगितले की, जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा त्याला असे वाटते की अर्चनाला तिच्या गरोदरपणाच्या दिवसात त्याने पूर्ण साथ दिली नाही. परमीत म्हणाला, “मी तुला अजिबात साथ दिली नाही. मी पूर्णपणे नकळत होतो. एक वेळ अशी होती जेव्हा तुम्हाला पूर्ण विश्रांतीची गरज होती आणि मी फुटबॉल खेळायला गेलो”.

आणखी वाचा – अपूर्वाच्या आयुष्यातील ‘मिस्ट्री मॅन’ समोर, अभिनेत्याच्या प्रेमात आहे अभिनेत्री, बालकलाकार म्हणून भूमिका गाजलीय

अर्चना म्हणाली की तिला भावनिकदृष्ट्या एकटे वाटत होते. अर्चनाने सांगितले की, “मी एकीकडे आजारी होते आणि गर्भपातानंतर माझी गर्भधारणा वाचवण्याचा प्रयत्न करत होते. आणि तो फुटबॉल खेळायला गेला”. दोघांनी त्यांच्या आयुष्यातील या कठीणकाळाबाबत भाष्य करत चुकीची कबुली दिली.

Tags: archana puran singhArchana Puran Singh miscarriageentertainment news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Bigg Boss Marathi 6

रुचिता-दिपाली एकमेकींना भिडल्या, 'बिग बॉस'च्या घरात तुफान राडा, कानाखाली मारली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.