Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात सुरू असलेल्या कॅप्टन्सी टास्कने मोठा वाद पेटवला आहे. टास्कदरम्यान झालेल्या गोंधळामुळे घरातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या टास्कमध्ये रुचिता आणि राकेश बापट यांच्यात जोरदार भांडण होतं. याचा परिणाम थेट टास्कवर झाल्याचं दिसून येत आहे. ‘कलर्स मराठी’ने ‘बिग बॉसट मराठी सिझन सहाचा नवीन प्रोमो शेअर केला आहे.
या प्रोमोमध्ये रुचिता राकेशला, “खेळायचं असेल तर खेळा, नाहीतर घरी जा” असं म्हणताना दिसते. तिच्या या बोलण्यामुळे राकेश बापट चांगलाच भडकतो आणि तो तिला “फालतू” असा शब्द वापरताना दिसतो. यावर रुचिता देखील शांत न बसता, “तू फालतू बे” असं प्रत्युत्तर देते. वाद वाढताना पाहून अनुश्री मध्येच हस्तक्षेप करत रुचिताला “तू कशाला बोलतेस?” असं म्हणून थांबवण्याचा प्रयत्न करते. मात्र, रुचिता शांत न बसता राकेशवर पुन्हा ओरडताना दिसते, “अरे एक नंबरचा नाटकी माणूस आहे” असं रुचिता राकेशला म्हणते. यानंतर राकेश प्रचंड संतापून मोठ्या आवाजात तिला गप्प बसायला सांगतो.
आणखी वाचा – “पैसे थकवल्यावर कलाकार आवाज उठवू शकतो” मंदार देवस्थळी वादावर ‘एलिझाबेथ एकादशी’ फेम अभिनेत्रीचं स्पष्ट भाष्य
इतकंच नाही तर राकेश थेट कॅमेऱ्याकडे पाहत, “या घरात एकतर ती राहील किंवा मी राहीन” असं स्पष्टपणे सांगतो. त्यानंतर तो बेडरूममध्ये जातो आणि तिथे आपला संताप व्यक्त करताना दिसतो. दरम्यान, हा प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या असून, बहुतांश प्रेक्षक राकेश बापटची बाजू घेताना दिसत आहेत. “रुचिता प्रत्येक टास्कचं वाटोळं करते,” “आम्ही राकेशसोबत आहोत,” अशा अनेक कमेंट्स प्रोमोखाली पाहायला मिळत आहेत. आता या वादाचा पुढे काय परिणाम होणार?, कॅप्टन्सी टास्क रद्द होणार की नाही आणि ‘बिग बॉस’ यावर काय निर्णय घेणार?, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.
आणखी वाचा – मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, पारंपरिक लग्नविधींना सुरुवात, फोटो समोर





