शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आज हे क्षण बघायला…”, आईच्या आठवणीत ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्याच्या डोळ्यांत पाणी, म्हणाले, “प्रामाणिकपणे काम करत होतो पण…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 8, 2024 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai kuthe kay karte fame anirudha aka Actor Milind Gawli emotional in memory of his mother video viral on social media

आईच्या आठवणीत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला अश्रु अनावर, भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर ठरलेली आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. गेल्या पाच वर्षांपासून टेलिकास्ट होणाऱ्या ह्या मालिकेचा स्टार प्रवाहवर ३० नोव्हेंबरला शेवटचा भाग प्रसारित झाला. मालिका संपणार, अशी घोषणा केल्यापासून अनेक कलाकार सोशल मीडियावर सोशल मीडिया पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. अशातच स्टार प्रवाहच्याच होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमात ‘आई कुठे काय करते’च्या टीमने खास हजेरी लावली. (Milind Gawli Emotional)

‘आई कुठे काय करते’ ही मालिकेच्या निरोपानिमित्त कलाकार शेवटच्या भागांचे शूटिंग संपवून ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ शोमध्ये पोहोचले. यावेळी ‘ठरलं तर मग’ मालिकेतील काही कलाकारांनीही हजेरी लावली. दोन्ही मालिकांतील कलाकारांनी या मंचावर नुसता धिंगाणा घातला. एकूणच  येथे सर्व कलाकारांनी भरपूर आनंद आणि मजा-मस्ती केल्याचे पाहायला मिळाले. मात्र यावेळी ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी आपल्या आईच्या आठवणीत काहीशे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आणखी वाचा – “माझ्याबरोबर लग्न करणार का?”, चाहत्याचा प्राजक्ता माळीला थेट प्रश्न, अभिनेत्रीही उत्तर देत म्हणाली, “माझं काही…”

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, यात ते आपल्या आईच्या आठवणीत भावुक झाले असून यावेळी ते असं म्हणाले की, “तू (सिद्धार्थ जाधव) एक कलाकार आहेस मी ही एक कलाकार आहे. बरीच वर्ष आपण काम करत आहोत, शुटींग संपलं की आपण घरी जातो. मागे वळून बघत नाही. पण स्टार प्रवाह एक परिवार आहे. मी त्याला परिवारच मानतो कारण ही पाच वर्षे काढणे सोपे नव्हते, स्टार प्रवाहने अनेक कार्यक्रम केले. ‘होऊदे धिंगाणा’मध्येही मी चार ते पाच वेळा आलो आहे त्यात त्यांनी मला कायम पुढे जा पुढे जा आम्ही आहोत असं म्हणत एका कुटुंबातील सदस्यासारखे वागवलं”.

आणखी वाचा – मोठी बातमी! प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई लीलावती रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये उपचार सुरु, आता कशी आहे प्रकृती?

यापुढे ते भावुक होत असं म्हणाले की, “आता पाच वर्षांनी जे काय प्रेम मिळत आहे आणि हा एक खास क्षणच आहे. माझ्या ३५-४० वर्षांच्या करिअरमधला सगळ्यात सुंदर क्षण… पण हा इतका सुंदर क्षण बघायला आज माझी आई नाही. त्यामुळे मला खूप रडू आलं. खूप वर्षे या क्षणासाठी प्रामाणिकपणे काम करत होतो. पण ती बघत असणार ना रे??”. यावर मंचावरील एक जण त्यांचे सांत्वन करत “हो…सर नक्की तुमची आई हे बघत असणार” म्हणते.

Tags: aai kuthe kay karte milind gawaliMilind Gawli EmotionalMilind Gawli Emotionali in memory of his mother milind gawli
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Maharashtrachi Hasyajatra fame comedy actor Arun Kadam said that his grandson will grow up and he will do his skits

“माझा नातू माझं स्किट करेल”, अरुण कदम यांचे नातवाविषयी भाष्य, म्हणाले, “मला स्क्रीनवर बघून...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.