‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ‘लाडका दादुस’ म्हणून घराघरांत पोहोचलेले अभिनेते म्हणजे अरुण कदम. अरुण कदम यांनी आजवर अनेक रिअॅलिटी शोजमधून विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचे महाराष्ट्रासह अवघ्या जगभरात अनेक चाहते आहेत. या चाहत्यांमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच चाहते आहेत. अरुण कदम यांचा लहान नातूदेखील या शोचा खूप मोठा चाहता आहे. (Arun Kadam on Grandson)
आपल्या विनोदी भूमिकांनी चर्चेत असणारे हे अरुण कदम हे सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांच्या पत्नी, लेक व नातवाबरोबरचे काही फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात. नातू अथांगबरोबर त्यांचा खास बॉण्ड आहे आणि हा खास बॉण्ड चाहत्यांना वेळोवेळी सोशल मीडियाद्वारे पाहायला मिळाला आहे. अरुण कदम ही नातवाबरोबरचे अनेक मजेशीर फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांचा मुलगादेखील त्यांच्या अभिनयाचा व महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचा खूप मोठा चाहता आहे. अनेकदा आपल्या आजोबांना टीव्हीवर बघून तो आनंदी होत असतो.
अशातच अरुण कदम यांनी आपल्या नातवाबद्दलचे खास भाष्य केलं आहे. इट्स मज्जाशी साधलेल्या संवादात अरुण कदम यांनी त्यांच्या नातवाबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं. यावेळी ते असं म्हटले की, “मोबाइलवर वगैरे माझी रील दिसली की तो बाबा बाबा म्हणून ओरडतो. इतकं त्याला कळतं. आमच्या दोघांचे बॉण्डिंग खूप छान आहे. जवजवळ महिनाभर मी आता त्याला भेटलेलो नाही. कार्यक्रमाची टुर आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्याला भेटता आलं नाही. पण आता भेटेन”.
यापुढे अरुण कदम असं म्हणाले की, “तो नेहमीच अपडेट होत असतो. आम्ही दोघे जेव्हाही भेटतो तेव्हा तो नवीन काही तरी शिकलेला असतो. नवीन काहीतरी त्याच्याकडे आलेलं असतं. म्हणजे तो मासा कसा करतो ही करुन दाखवतो. सगळ्या गोष्टी तो आता शिकत चालला आहे. म्हणजे आता दीड वर्षांचाच आहे, पण आता मोठा झाला तर कदाचित माझं स्किटसुद्धा तो करु शकेल”.