आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. तिने ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मात्र आता तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटांमधूनही प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तिने ‘पांडू’, ‘पावनखिंड’ सारख्या चित्रपटातून आपापल्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना दाखवल्या. अभिनयात यश मिळवत असताना तिने स्वतःचा ज्वेलरी ब्रॅण्डदेखील सुरू केला. प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. (Prajakta Mali on Fan’s Question)
अभिनय, सूत्रसंचालन, नृत्य याशिवाय निर्मिती… अशा अनेक भूमिका पार पाडणारी प्राजक्ता सोशल मीडियावरही चर्चेत राहत असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या सौंदर्याची भुरळ असलेली अनेक तरुण चाहते तिला आपली क्रश मानतात. सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये एकच चर्चा असते ती म्हणजे तिच्या लग्नाची. प्राजक्ता लग्न कधी करणार असा प्रश्न सर्वांना पडलेला असताना एका चाहत्याने चक्क तिला लग्नाची मागणीच घातली आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीने बाथटबमध्ये गमावला, जागीच गुदमरुन मृत्यू, परफॉर्मन्स करण्यास जाणार होती पण…
अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चाहत्यांबरोबर प्रश्नोत्तरांचं सेशन घेतलं. यावेळी एका चाहत्याने प्राजक्ताला थेट यावेळी एका चाहत्याने प्राजक्ताला “तु माझ्या बरोबर लग्न करणार का? तुझ्यामुळे मी पण लग्न केलं नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे” असं विचारलं. यावर प्राजक्ताने तिच्या खास अंदाजात चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देत असं म्हटलं की, “माझं काही खरं नाही… तुम्ही करुन टाका.. (सगळेच जे थांबलेत) (जनहित में जारी..) (Spread the word..)”
दरम्यान, या हटके प्रश्नाशिवाय अनेकांनी तिला तिच्या ‘फुलवंती’ चित्रपटाचे कौतुक करणारे मॅसेजही केले. तसंच तिच्या अभिनयाचे, डान्सचे, ती सध्या वाचत असलेल्या पुस्तकाचे, व्यायाम, योगाबद्दलचे असे अनेक प्रश्नदेखील विचारले. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने नुकताच ‘फुलवंती’ नावाचा चित्रपट केला. यात तिने निर्माती व अभिनेत्री म्हणून दोन्ही भूमिका पार पडल्या.