शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आपल्या उंचीला आल्या अन्…”, ‘आई कुठे…’ फेम मधुराणी प्रभुलकरने केलेली पोस्ट लक्षवेधी, खास फोटो शेअर करत म्हणाली, “बघता बघता…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 15, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Aai kuthe kay karte fame actress madhurani prabhulkar shared photo with her daughter on Instagram see the details

"आपल्या उंचीला आल्या अन्...", 'आई कुठे...' फेम मधुराणी प्रभुलकरने केलेली पोस्ट लक्षवेधी, खास फोटो शेअर करत म्हणाली, "बघता बघता..."

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर. मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणी प्रभुलकरने तिच्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेमुळे मधुराणी प्रचंड लोकप्रियता व प्रसिद्धी मिळाली आहे.  मधुराणी सोशल मीडियावरदेखील तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. (Madhurani Prabhulkar On Instagram)

अशातच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियाद्वारे तिच्या लेकीबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत आणि हे खास फोटो शेअर करत तिने त्याखाली एक कॅप्शनदेखील लिहिलं आहे. या फोटोखालील कॅप्शनमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “ह्यांना आत्ता आत्ता हाताचा पाळणा करून जोजवत होतो आणि बघता बघता या मुली आपल्या उंचीला आल्यासुद्धा.. किती झरझर मोठ्या होतात या लेकी…”

View this post on Instagram

A post shared by Madhurani Gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar)

आणखी वाचा – Video : लग्नाच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीने शेअर केली नवऱ्याची हळवी बाजू, खास व्हिडीओ केला पोस्ट, लेकींचा चेहराही आला समोर अन्…

मधुराणीने शेअर केलेल्या या खास फोटोमध्ये मधुराणीने पांढऱ्या रंगाची आकर्षक साडी नेसली आहे. तर त्यावर साजेसा गुलाबी रंगाचा ब्लाऊजही परिधान केला आहे. तर मधुराणीच्या लेकीनेदेखील छान नक्षीकाम असलेला पंजाबी ड्रेस परिधान केला आहे, तर मधुराणीच्या भाचीनेदेखील पंजाबी ड्रेस परिधान केला असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “तुमची औकात आहे का?”, अंकिताने विकीजवळ केली त्याच्या आई-वडिलांची तक्रार, नेटकरी म्हणाले “खूप गर्विष्ठ कुटुंब…”

या फोटोमध्ये मधुराणीसह तिची लेक व भाची या खूपच गोड दिसत आहेत. दरम्यान, मधुराणीने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनीदेखील लाईक्स व कमेंट्स करत चांगला प्रतिसाद दिला आहे. “लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं, खूपच छान फोटो, सुंदर आणि गोड,” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी या फोटोला पसंती दर्शवली आहे.

Tags: aai kuthe kay karteentertainment newsmadhurani prabhulkarmarathi actressmarathi entertainmentMarathi newsmarathi serialsआई कुठे काय करतेमधुराणी प्रभूलकरमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीमराठी मालिका
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
Next Post
Pooja Sawant On Her Past

लग्नाआधी नवऱ्याला भूतकाळ सांगण्याबाबत पूजा सावंतने केला खुलासा, म्हणाली, "मला त्याला सगळं सांगायचं होतं पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.