शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अरुंधती चुकली आणि ती…”, ‘आई कुठे…’चा नवा प्रोमो पाहून संजनाची बाजू घेत आहेत प्रेक्षक, नेमकं काय घडलं?, म्हणाले, “अनिरुद्ध व तिच्यामध्ये…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 26, 2024 | 12:15 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Aai kuthe kay karate new promo the audience took Sanjan's side in the comments

"अरुंधती चुकली आणि ती...", 'आई कुठे...'चा नवा प्रोमो पाहून संजनाची बाजू घेत आहेत प्रेक्षक, नेमकं काय घडलं?, म्हणाले, "अनिरुद्ध व तिच्यामध्ये..."

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते?’ ही मालिका गेले काही दिवस चांगलीच चर्चेत आहेत. गेली साडेचार वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गेल्या साडेचार वर्षात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मालिकेत आजवर अनेक बदल झाले. अनेक मोठे ट्विस्ट आले. यावेळी प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रियाही दिल्या. अशातच मालिकेत नुकतेच आशुतोषचे निधन झाल्याचा ट्विस्ट पाहायला मिळाला. सोशल मीडियावर या नवीन ट्विस्टने चांगलाच धुमाकूळ घातला. मात्र या नवीन ट्विस्टमुळे या मालिकेवर अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली.

मालिकेत आलेले हे धक्कादायक वळण प्रेक्षकांना आवडलेले नाही. ‘आई कुठे काय करते’च्या या नवीन प्रोमोवर प्रेक्षक चांगलेच संतापले होते. आशातच आता या मालिकेचा आणखी एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुलेखा ताई म्हणजेच आशुतोच आई आशुतोषच्या निधनाला अरुंधती जबाबदार असल्याचे म्हणतात. तसेच “ती आता माझी कुणीही लागत नाही. आशुतोषने कायम तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपड केली. मात्र अरुंधतीने कायम त्याच्याकडे दुर्लक्ष केले” असं म्हणतात

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आणखी वाचा – “या भूमिकांसाठी तुम्हीच योग्य”, स्पृहा जोशी व सागर देशमुखच्या ‘सुख कळले’ मालिकेच्या नवीन प्रोमोला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

या नवीन प्रोमोवरसुद्धा चाहत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी या नवीन प्रोमोवर नकारात्मक कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी “खूप फालतू मालिका आहे, एक तरी नाते व्यवस्थित दाखवा, हे बघून हसावं की रडावं तेच कळत नाहीये” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसेच अनेकांनी या व्हिडीओखाली संजनाची बाजू घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. एकाने तिची बाजू घेत असं म्हटलं आहे की, “संजना अगदी योग्य आहे. ती बोलते ते बरोबर असतं” तर आणखी एकाने “अरुंधती चुकली आहे आणि आता ती संजना व अनिरुद्धच्या मध्ये मध्ये येत आहे” अशी कमेंट केली आहे.

आणखी वाचा – सागर-मुक्ताच्या प्रेमाच्या गोष्टीला लागणार सावनीची नजर, लेकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळली नवी चाल, प्रोमो पाहून प्रेक्षकांचा हिरमोड

मालिकेत आतापर्यंत संजना हे पात्र कुणालाच आवडत नव्हते. तिच्या नकारात्मक भूमिकेमुळे तिचा सर्वांना राग येत होता. मात्र आता संजना ही योग्य असल्याचे अनेक प्रेक्षकांना वाटत आहे. त्यामुळे अनेक चाहते संजनाची बाजू घेत आहेत. दरम्यान, मालिकेतील आशुतोषच्या अचानक जाण्याने अरुंधतीच्या आयुष्यात आता काय नवीन बदल होणार? याची प्रेक्षक वाट पाहत आहेत.  

Tags: Aai kuthe kay karatemarathi entertainment newsmarathi serial
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Sharad Ponkshe Son

मुलगी पायलट तर लेक करणार चित्रपटांचं दिग्दर्शन, शरद पोंक्षेच्या मुलाची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री, वडिलच साकारणार मुख्य भूमिका

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.