शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सापांची तस्करी प्रकरणात एल्विश यादव पाठोपाठ मानसी नाईकच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं नाव समोर, स्पष्टीकरण देत म्हणाला, “आम्ही सापांची…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 7, 2023 | 11:12 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pardeep Kharera On Elvish Yadav

सापांची तस्करी प्रकरणात एल्विश यादव पाठोपाठ मानसी नाईकच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं नाव समोर, स्पष्टीकरण देत म्हणाला, "आम्ही सापांची…"

प्रसिद्ध यूट्यूबर आणि ‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादवविरोधात रेव्ह पार्ट्यांचं आयोजन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस एफआयआरनुसार, एल्विश यादव नोएडामध्ये रेव्ह पार्ट्या आयोजित करत असे. तसेच या पार्टीत बंदी असलेले साप आणि परदेशी मुलींनाही प्रवेश मिळाल्याचं समोर आलं. या प्रकरणावरून एल्विशसह आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर एल्विश यादवने ही एक व्हिडीओ शेअर करत या प्रकरणात त्याचा हात नाही असं सांगितलं. (Pardeep Kharera On Elvish Yadav)

या प्रकरणात जसं एल्विश यादवचं नाव घेण्यात आलं तसेच आता या प्रकरणात मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिचा पूर्वाश्रमीचा पती प्रदीप खरेरा याचाही संबंध असल्याचं बोललं जात आहे. एल्विशच्या सगळ्या व्हायरल व्हिडीओमध्ये प्रदीप दिसत असल्याने या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे “तू सुद्धा या प्रकरणात सामील आहेस का?” असे अनेक प्रश्न नेटकरी करताना दिसत आहेत. यावर आता प्रदीपने व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे.

आणखी वाचा – “मराठी मुलगा बिझनेस करतोय याचं…”, सुप्रिया पाठारेंच्या लेकाच्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर मिलिंद गवळींची पोस्ट; म्हणाले, “आई-बापाच्या जीवावर…”

प्रदीपने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “नमस्कार मित्रांनो! एल्विशबद्दल सध्या ज्या बातम्या व्हायरल होत आहेत त्या सगळ्या खोट्या आहेत. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, कृपया या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. खोट्या प्रकरणात एल्विशचं नाव पुढे करण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. आमच्या दोघांचे एकत्र व्हिडीओ पाहून अनेकांनी मला व माझ्या कुटुंबीयांना फोन करून याबद्दल चौकशी केली. पण, मी हेच सांगेन की, आम्हाला चुकीच्या पद्धतीने यात अडकवण्यात येत आहे.”

View this post on Instagram

A post shared by Pardeep Kharera (@pardeepkharera1)

आणखी वाचा – ‘तो’ आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या पाठिंब्यावर रश्मिका मंदानाची पोस्ट, म्हणाली, “तुमच्यासारख्या लोकांमुळे…”

पुढे तो असंही म्हणाला आहे की, “माझा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. काही गोष्टी नकारात्मकतेने पसरवल्या जात आहेत. आम्ही सगळी मुलं एका गाण्याच्या शूटिंगसाठी जमलो असतानाचे हे सगळे व्हिडीओ आहेत. हा व्हायरल व्हिडीओ गाण्याचा एक भाग होता. हे गाणं आम्ही सहा महिन्यांपूर्वी शूट केलं होतं. आम्ही सापांची तस्करी वगैरे केलेली नाही.” असं स्पष्टीकरण देत प्रदीप खरेराने काही व्हायरल व्हिडीओदेखील शेअर केले आहेत.

Tags: bigg boss ottelvish yadaventertainmentPardeep khareraPardeep Kharera On Elvish Yadav
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Aadesh Bandekar On Khel Mandiyela

दुबईला निघाले आदेश बांदेकर, आता पैठणीचा खेळ परदेशात रंगणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाले, "इतके वर्ष…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.