काही कलाकार मंडळींनी आपली स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यान्हा असा खास चाहतावर्ग आहे. यांत एक नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेते आदेश बांदेकर. संध्याकाळ झाली की दार उघड बये दार या टायटल सॉंगने सगळ्यांच्या घरी मालिका पाहण्याचा प्रारंभ होतो. आदेश बांदेकर म्हणजे सर्वांचे लाडके भावोजी. होम मिनिस्टर या कार्यक्रमामुळे भावोजी म्हणून आदेश यांना घराघरात ओळखलं जात. अभिनेते आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून आदेश बांदेकर यांनी आपल्या कला कौशल्याची छाप सर्वत्र सोडली आहे. (Aadesh Bandekar Suchitra Bandekar)
आदेश बांदेकर यांची पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या देखील लोकप्रिय अभिनेत्रीं पैकी एक आहेत. बांदेकरांची संपूर्ण फॅमिली ही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. लवकरच सुचित्रा या मोठया पडद्यावर झळकताना दिसणार आहेत. बाईपण भारी देवा या आगामी मल्टीस्टारर चित्रपटातून त्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये संपूर्ण टीम व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान सुचित्रा यांनी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमावेळी सुचित्रा बांदेकर यांना प्रेक्षकांमधून उखाणा घेण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी त्यांनी अरे बापरे असं म्हणत त्यांना प्रतिक्रिया दिली.
पाहा उखाणा घेण्याआधी काय म्हणाल्या सुचित्रा बांदेकर (Aadesh Bandekar Suchitra Bandekar)
कार्यक्रमात उपस्थित महिलांपैकी एकाने, “भावोजी आम्हाला सर्वांना उखाणे घ्यायला लावतात, आज तुम्ही उखाणा घ्या” असं म्हणत सुचित्रा बांदेकरांकडे हट्ट केला. यावेळी त्यांनी तुमच्या अपेक्षा खूप आहेत, असं कस अचानक नाव घेणार म्हणत प्रेक्षकांनाच उलट प्रश्न केला. त्यानंतर सुचित्रा या उखाणा घ्यायला तयार झालेल्या दिसत आहेत. चला तर पाहूया सुचित्रा यांनी आदेश भावोजींसाठी काय उखाणा घेतला आहे. (Aadesh Bandekar Suchitra Bandekar)
हे देखील वाचा – करायचं होत कबड्डीमध्ये करिअर पण अपघाताने झाला सुपरस्टार
सुचित्रा बांदेकर यांनी आदेश बांदेकर यांच्यासाठी घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे सुचित्रा बांदेकरांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओही शेअर केला आहे. “बांदेकरांसाठी स्पेशल उखाणा”, असे कॅप्शन सुचित्रा बांदेकरांनी या व्हिडीओला दिले आहे. त्याच्या या व्हिडिओला अनेक चाहत्यांनी पसंती दर्शविली आहे.
