‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका बराच काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.या मालिकेचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. मालिकेच्या यशामध्ये नायक,नायिका जितके महत्वाचे असतात, तितकंच मालिकेचे कथानक पुढे जाण्यासाठी महत्वाची भूमिका खलनायिकांची असते.(Jahnavi Killekar Son)
अशीच सध्या चर्चेत असणारी, आणि खलनायिका असूनही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळणारी खलनायिका म्हणजे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर.’भाग्य दिले तू मला’ या मालिकेतील सानिया या भूमिकेतून जान्हवी प्रेक्षकांच्या भेटीला येते.तिच्या सानिया या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो आहे.
पाहा जान्हवीने लेकाला काय गिफ्ट दिलं? (Jahnavi Killekar Son)
तिला पडद्यावरच्या तिच्या भूमिकेसाठी जितकं प्रेम मिळतंय तितकंच प्रेम तिला जान्हवी म्हणून देखील मिळताना पाहायला मिळत आहे.जान्हवी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील विशेष चर्चेत असते.जान्हवीच्या फिटनेसचं देखील खास कौतुक होताना पाहायला मिळत.जान्हवीचा मुलगा ईशान किल्लेकरला देखील सध्या प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.काही दिवसानं पूर्वी ईशानचा वाढदिवस होता, जान्हवीने त्याच्यासाठी खास पोस्ट देखील केली होती.(Jahnavi Killekar Son)

तर आता ईशानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून वाढदिवसाला त्याला मिळालेल्या भेटवस्तूंचा फोटो शेअर केला आहे.त्यात त्याला जान्हवीने आय पॅड भेट म्हणून दिला आहे.जान्हवीने ईशानला दिलेल्या या महागड्या गिफ्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तसेच भाग्य दिले तू मला या मालिकेच्या सेटवर देखील जान्हवीचं सहकलाकारांसोबत चांगलं बॉण्डिंग पाहायला मिळत.सहकलाकारांसोबतचे अनेक व्हिडिओज ती शेअर करत असते.त्यांना देखील सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळतो.