सध्या बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अधिक चर्चेत असलेली बघायला मिळत आहे. लग्न झाल्यापासून ती अनेकदा परदेशदौरा करताना दिसत आहे. सध्या ती पती झहीर इक्बालबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये धमाल करताना दिसत आहे. तिचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर बघायला मिळत आहेत. ३१ डिसेंबर २०२४ रोजी या दोघांनी चाहत्यांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाला आहे. मात्र तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र त्यांच्या मागे झालेल्या आतिषबाजीकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. (sonakshi sinha viral post)
सोनाक्षी व झहीर यांनी सिडनीमध्ये नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सोनाक्षी व झहीर यांनी कॅमेरासमोर ‘हॅपी न्यू इयर’ बोलताना दिसले. तसेच मागे आकाशात खूप सारे फटाकेदेखील दिसले. तसेच कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, “आमचे नवीन वर्ष सुरु झालं आहे. सिडनी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”. मात्र ही पोस्ट लोकांच्या पचनी पडलेली दिसून आली नाही.
आणखी वाचा – प्रिन्स नरुला व युविका चौधरीच्या लेकीचं बारसं, नाव ठेवलं एकदम खास, अर्थ आहे…
सोनाक्षीच्या या पोस्ट नंतर सोशल मीडियावर चाहत्यांची एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. काही लोकांनी अभिनेत्रीला ढोंगी म्हंटलं आहे. दरम्यान ही प्रतिक्रिया देताना चाहत्यांनी तिच्या आधीच्या एका व्हिडीओची चर्चा केली आहे. यामध्ये सोनाक्षीने दिवाळीमध्ये फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले होते की, “आता हवा अशी आहे. मला सगळ्यांना विचारायचं आहे की आता जे तुम्ही फटाके फोडत आहात, तुम्ही सगळे वेडे आहात का?”.
या प्रतिक्रियेनंतर सोनाक्षीने सोशल मीडियावर कमेंट सेक्शन बंद केले आहे. रेडिट युजरने लिहिले की, “कारण ती ढोंगी आहे. या कलाकारांसाठी फक्त दिवाळीच्या दरम्यान फोडलेल्या फटाक्यांनी प्रदूषण होते. नवीन वर्षात तर फटक्यांपासून ऑक्सिजन निघतो”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “खरं रडणं”. अनेकांनी सोनाक्षीच्या बाजूनेदेखील चर्चा केली आहे. ते म्हणाले की, “सोनाक्षी स्वतः फटाके फोडत नाही आहे”. दरम्यान आता सोनाक्षीचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.