शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पैसे देऊन आणि जीव मुठीत घेऊन…”, रिक्षा चालवताना मोबाईल बघणाऱ्या चालकावर भडकल्या मंजिरी ओक, म्हणाल्या, “यांची अरेरावी पण…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 31, 2024 | 10:11 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
manjiri oak shared a video of auto driver who is watching mobile phone while driving a rickshaw

रिक्षा चालवताना मोबाईल बघणाऱ्या चालकावर भडकल्या मंजिरी ओक, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये किंवा त्याचा वापर करु नये हा वाहतुकीचा नियम आहे. पण अलीकडे हा नियम अनेक वाहन चलकांकडून मोडण्यात येत असल्याचे पाहायला मिळतं. अलीकडे अनेक रिक्षा चालक या मोबाईलचा अगदी सर्रास वापर करतात. अनेक सामान्य नागरिकांना हा अनुभव रोजच येत असतो. अनेक जण याबद्दल व्यक्तही होताना पाहायला मिळतात. अशातच कलाकार मंडळींनाही रिक्षा चालकांच्या या मोबाईल बघण्याच्या सवयीचा त्रास होत आहे आणि याबद्दल ही कलाकार मंडळी आपल्या सोशल मीडियाद्वारे व्यक्त होतानाही दिसतात. असंच काहीसे झाले आहे मंजिरी ओक यांच्याबद्दल. मंजिरी ओक या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. (manjiri oak angry on auto driver)

सोशल मीडियावर त्या त्यांचे अनेक फोटो व प्रसाद ओक यांच्याबरोबरचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच त्यांनी नुकताच शेअर केलेला व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे आणि हा व्हिडीओ आहे रिक्षा चालवताना मोबाईल बघणाऱ्या चालकाचा. मंजिरी ओक यांनी रिक्षा चालवताना मोबाईल बघणाऱ्या चालकाचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि असं म्हटलं आहे की, “पैसे देऊन आणि वर आपला जीव मुठीत घेऊन, असा प्रवास का करायचा? आणि यावर यांना काही बोलायच नाही. कारण यांचीच अरेरावी ऐकून घ्यायला लागेल. दोनदा सांगूनही काही सुधारणा न झाल्यामुळे मी रिक्षा बदलली”.

View this post on Instagram

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

आणखी वाचा – 31 December Horoscope : २०२४ या वर्षाचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? तुमच्या नाशिबात नेमकं काय? जाणून घ्या…

यापुढे ती म्हणाली, “आणि तरी ही त्याला काही फरक पडला नाही. म्हणजे भाडं गेलं तरी चालेल. समोरच्याचा आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालीन, पण मी रिक्षा चालवताना असा फोन बघणारच. पूर्ण वेळ हा असाच रिक्षा चालवतो असं अत्यंत अभिमानानी सांगितलं त्यांनी मला. एकूणच कठीण आहे सगळं. देव त्याला अक्कल देवो”. या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट्स करत याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “हा प्रकार वाढला आहे आणि यांची अरेरावी पण”, “डोकीच गहाण पडली असतील तर काय करणार, कर्म तैसे फळ मिळेल” खरं आहे हे खुप वाढलं आहे, तरुण पण आणि वायाने मोठे असलेले पण हे करतात”. अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – सरत्या वर्षाला निरोप देताना ‘फ्रेशर्स’ फेम अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली, रोमँटिक फोटो केला शेअर, ‘ती’ व्यक्ती कोण?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हाच प्रकार अभिनेत्री रेश्मा शिंदेबरोबरही झाला होता. रेश्मानेही याबद्दलचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. “तुम्हाला असा अनुभव आला आहे का? रिक्षा चालक असेच व्हिडीओ, रील्स बघत रिक्षा चालवतो का?” असं म्हणत तिने व्हिडीओ शेअर केला होता. सकाळी सहा वाजता हा व्हिडीओ रेश्माने शेअर केला होता. अशातच आता मंजिरी ओक यांचा या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Tags: manjiri oak angry on auto drivermanjiri oak angry on auto driver who is watching mobile phone while drivingmanjiri oak auto driver video
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
sukanya mone viral post

सुकन्या मोनेंची लेक झाली ‘मास्टर’, परदेशात ‘या’ विषयात मिळवली पदवी, आईची मुलीसाठी कौतुकास्पद पोस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.