रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अखेर संतोष जुवेकरने कुशल बद्रिकेकडून घेतलं महागडं गिफ्ट, हायवेलाच भेटून सरप्राइज अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 30, 2024 | 4:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor Santosh Juvekar took expensive shoes from Kushal Badrike on the highway as his birthday gift video viral on social media

अखेर संतोष जुवेकरने कुशल बद्रिकेकडून 'ते' महागडं Birthday Gift घेतलंच, व्हिडीओ व्हायरल

मराठी मनोरंजन क्षेत्रातली प्रसिद्ध असलेली मित्रांची जोडगोळी म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके व संतोष जुवेकर ही जोडी. हे दोघेही ‘स्ट्रगलर साला’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यांच्यातील मैत्री प्रत्येकाला आपलीशी वाटते. हे दोघे सोशल मीडियावर त्यांच्याबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच काही दिवसांपूर्वी कुशलने संतोषचा एक व्हिडीओ शेअर केला होता आणि या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. हा व्हिडीओ होता संतोषच्या वाढदिवसानिमित्त कुशलकडून त्याला हव्या असलेल्या गिफ्टचा. १२ डिसेंबर रोजी अभिनेता संतोष जुवेकरचा वाढदिवस साजरा झाला. संतोष त्याच्या वाढदिवसाचे गिफ्ट मिळावे म्हणून कुशलला घेऊन मॉलमध्ये गेला होता. (santosh juvekar took shoes from kushal badrike)

मात्र तिथे गेल्यानंतर संतोषची फजिती झाली. झालं असं की, संतोषला कुशलकडून एका लोकप्रिय ब्रॅंडचे शूज गिफ्ट म्हणून हवे होते. पण दोघेही मॉलमध्ये पोहोचले तेव्हा समजलं की, त्या ब्रॅंडचं शोरुम कायमचंच बंद झालं आहे. यावेळी कुशलने संतोषच्या झालेल्या फजितीची झलक सोशल मीडियाद्वारे शेअर केली होती. संतोषचा हा कुशलकडून महागडं गिफ्ट घेण्याचा प्लॅन फसला आणि हे सगळं कुशलने एक व्हिडिओ शेअर करत सांगितलं होतं. मात्र आता संतोषने या फजितीचा बदला कुशल कडून घेतला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

संतोषने कुशलकडून त्याला हव्या असलेल्या लोकप्रिय ब्रॅंडचे शूज गिफ्ट म्हणून कुशलकडून घेतले आहेत. संतोषने कुशलला ते शूज ऑनलाइन मागवायला लावले आहेत आणि याचाच व्हिडीओ कुशलने शेअर केला आहे. या व्हिडीओसह कुशलने असं म्हटलं आहे की, “आणि मग तो ऑनलाइन त्याच्या वाढदिवसाचं गिफ्ट जबरदस्तीने बुक करायला लावतो आणि मग मला रस्त्यात गाठून त्याच्या वाढदिवसाचं गिफ्ट घेऊन बाय न करता निघूनसुद्धा जातो”.

आणखी वाचा – “पुराव्याशिवाय नाव घेऊ नका आणि…”, प्राजक्ता माळीच्या बदनामीवर मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “उगीच टीका करत…”

तसंच या व्हिडिओमध्ये कुशल असं म्हणत आहे की, “टोल नाक्यावरची वसूली आता बंद झाली आहे, ही खोटी बातमी आहे. खरी बातमी ही आहे की, टोल नाक्यावर कलाकारांना अडवून वसूली केली जात आहे”. कुशल हे म्हणत असतानाच संतोष त्याच्या गाडीतून नाचत नाचत उतरतो आणि तो कुशलकडून त्याचे गिफ्ट घेतो आणि पुन्हा गाडीत बसून निघूनही जातो. यादरम्यान, कुशल असं म्हणतो की, “शेवटी संतोषला जे शूज हवे होते ते त्याने माझ्याकडून ऑनलाइन मागवून घेतले आहेत”.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लगीनघाई!, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, पारंपरिक लूकमध्ये नटली नवरी

दरम्यान, कुशल-संतोष यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसादही दिला आहे. तसंच अनेकांनी या व्हिडीओखाली “अरे शेवटी दोस्ती रे कुश्या संत्याची”, “मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा”, “मित्र असेच हरामी असतात”, “ही दोस्ती तुटायची नाय” अशा अबेक कमेंट्स केल्या आहेत.    

Tags: kushal badrikesantosh juvekarsantosh juvekar took shoes from kushal badrike
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
shweta tiwari on daughetr relationship

"माझी मुलगी तीन मुलांबरोबर...", लेकीच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर भडकली श्वेता तिवारी, म्हणाली, "मीच दर वर्षी लग्न करुन..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.