रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाणच्या नवीन घराच्या बांधकामाला सुरुवात, स्वतःही घेत आहे मेहनत, व्हिडीओमध्ये दाखवली झलक

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 27, 2024 | 2:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
suraj chavhan home

सूरज चव्हाणच्या नवीन घराचे बांधकाम सुरु

या वर्षी ‘बिग बॉस’ मराठीचं पाचवं पर्व चांगलंच चर्चेत राहिले आहे. टिकटॉकस्टार सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता झाला. विजेता झाल्यानंतर त्याचे सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले. ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकल्यावर मी माझं स्वतःचं घर बांधणार असल्याचेही बरेचदा म्हटलं होतं. त्याच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बऱ्याच जणांनी पुढाकारही घेतला. आता अखेर या घराच्या कार्याचा श्रीगणेशा झाला आहे. नुकतेच सूरज चव्हाणच्या नवीन घराचे भूमिपूजन पार पडले. ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनीसुद्धा सूरजची भेट घेऊन त्याच्या घराच्या स्वप्नाला हातभार लावण्याचे वचन दिले होते आणि आता हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे.  (suraj chavhan home)

येत्या सहा महिन्यात त्याचे हे नवीन घर उभे राहणार असल्याचा खुलासा स्वतः सूरजनेच केला आहे. तसंच या नवीन घरासाठी धनंजय पोवार फर्निचर देणार असल्याचेही त्याने आधी सांगितले होते. धनंजय यांनी सूरजच्या नवीन घरात त्यांच्या दुकानातील वस्तू देणार असल्याचे सांगितलं आहे.  दरम्यान आता सूरजचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये सूरज घराच्या बांधकामामध्ये मदत करत असल्याचे दिसून येत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सूरज घराच्या बांधकामांवर पाणी मारताना दिसत आहे. तसेच घमेल्यामध्ये सीमेंट भरुन देतानाही दिसत आहे. घर बांधताना त्याने केलेली मेहनत दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने “माझं घर, लवकरच ‘बिग बॉस’चा बंगला”, असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

आणखी वाचा – Video : ना भरजरी साडी, ना महागडे दागिने, ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीचा लग्नासाठी साधाच लूक, मंगळसूत्राच्या डिझाइनची रंगली चर्चा

View this post on Instagram

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

सूरजचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याच्या व्हिडीओला अनेकांची पसंती मिळाली आहे. तसेच नेटकरी यावर प्रतिक्रिया देतानाही दिसत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली की, “स्वतःचं घर स्वतः तयार करत आहे”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “स्वतः केलेली मेहनत कधीही वाया जात नाही, तसेच अजून एकाने लिहिले की, “सूरज तुझ्या जिद्दीला सलाम”. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – अभिनयक्षेत्रासह व्यवसायामध्येही यशस्वी आहेत मराठी कलाकार, वर्षभरात काहींनी लाँच केला स्वतःचा ब्रँड, हॉटेलही केलं सुरु

दरम्यान, सूरज चव्हाण यंदाच्या ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यामुळे त्याला १४ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस तसेच एक स्कुटी मिळाली. तसंच त्याचा ‘झापुक झुपूक’ हा नवीन चित्रपटही येत आहे. याशिवाय त्याला इतरही बऱ्याच जणांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

Tags: new homesuraj chavhanviral video
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Aai Kuthe Kay Karte, Satvya Mulichi Satavi Mulgi, Bhagya Dile Tu Mala, Man Dhaaga Dhaaga Jodte Nava, Durga, Abeer Gulal serials off aired in the year 2024.

२०२४मध्ये छोट्या पडद्यावरील बहुचर्चित मालिकांनी घेतला प्रेक्षकांचा निरोप, कोणी सेटवरच रडलं तर काही एकमेकांपासून दुरावल्याने भावुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.