२०२४ या वर्षात अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या मनोरंजन क्षेत्राव्यतिरिक्त व्यसवाय क्षेत्रात पदार्पण केलं. कुणी स्वत:चं हॉटेल सुरु केलं, तर कुणी स्वत:चा सेलोन उभं केलं. यंदाच्या वर्षी अशा कोणकोणत्या कलाकारांनी व्यसवाय क्षेत्रात पदार्पण करत नवी सुरुवात केली? चला जाणून घेऊया… (Marathi Artist New Business)
- मृणाल दुसानिस : या वर्षात अभिनेत्री मृणाल दुसानिसने व्यवसे क्षेत्रात पदार्पण केलं. मृणाल दुसानिसने स्वत:चं रेस्टॉरंट सुरु केलं. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये मृणालने हे नवं रेस्टॉरंट सुरु केलं आहे आणि या रेस्टॉरंटचं नाव ‘बेली लाफ्स’ असं आहे. तिच्या या नवीन व्यवसायानिमित्त तिला मराठी कलाविश्वातून अनेक कलाकार मंडळींनी शुभेच्छा दिल्या. या रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्याला खास हजेरी लावली होती.
- तेजस्विनी पंडीत : या वर्षात अभिनेत्री तेजस्विनी पंडितने पुण्यात एक नवा व्यवसाय सुरु केला. अभिनेत्रीने पुण्यात एक आलिशान सलोन सुरु केलं असून त्याचं नावंही हटके आहे. ‘एएम टू एएम’ असं या तिच्या नव्या सलोनचं नाव आहे. अभिनेत्रीच्या या सलोनचं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. शिवाय यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधव, धैर्य घोळप हे कलाकारही उपस्थित होते.
- रेश्मा शिंदे : या वर्षात टेलिव्हिजनवरील आघाडीची नायिका अभिनेत्री रेश्मा शिंदेनेसुद्धा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पुणे, कोथरूड येथे स्वतःचं ज्वेलरी स्टोअर उघडलं आहे. तसंच या वर्षात अभिनेत्री विवाहबंधनातही अडकली. पवनबरोबर तिने लग्नगाठ बांधली. उद्योजिका म्हणून नवीन प्रवास सुरू करताना मला अतिशय आनंद होत आहे. असं म्हणत तिने ही आनंदाची बातमी शेअर केली होती.
- तुषार देवल : ‘चला हवा येऊ द्या’ फेम संगीतकार तुषार आणि स्वाती यांनी व्यवसायात पाऊल टाकत या वर्षी स्वत:चं हॉटेल वर्षी सुरू केलं. ‘देवल मिसळ’ या शाखेचं उद्धाटन केंद्रीय मंत्री पीयूष जी गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. यानिमित्ताने त्याने “माझं अजून एक स्वप्नं पूर्ण झालं” असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
- प्रसाद लिमये : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका नवरी मिळे हिटलरला मधला किशोर जहागीरदार म्हणजेच अभिनेता प्रसाद लिमयेनेही यंदाच्या वर्षात नवीन व्यवसाय सुरु केला. प्रसाद ने स्वतःचे हॉटेल उघडले आहे. हे हॉटेल ठाण्यात असून त्याचे नाव अन्नपूर्णा असे आहे.