मराठी मालिका ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. यातील एक भूमिका म्हणजे आरोही. ही भूमिका अभिनेत्री कौमुदी वलोकरने साकारली होती. कौमुदी तिच्या खासगी आयुष्यामुळे आता चर्चेत आली आहे. काल म्हणजे २६ डिसेंबर २०२४ रोजी ती आकाशबरोबर लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे अनेक फोटोदेखील समोर आले. तसेच काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाआधीचे विधी म्हणजे मेहंदी, हळद, संगीत असे अनेक समारंभ मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमांचेदेखील अनेक फोटो सोशल मीडियावर बघायला मिळाले. आता तिच्या लग्नानंतरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. (kaumudi walokar new look)
कौमुदी व आकाशचा पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. यावेळी कौमुदीने चिंतामणी रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तसेच त्यावर मॅचिंग गुलाबी रंगाचा ब्लाऊज व गुलाबी रंगाची शाल घेतली होती. तसेच सुंदर असे उठावदार दागिनेदेखील परिधान केले होते. तसेच आकाशने फिकट पांढऱ्या रंगाचा कुर्ता, गुलाबी रंगाचे धोतर परिधान केले होते. तसेच त्यावर मॅचिंग आणि कौमुदीच्या साडीला मॅचिंग शाल घेतली होती. दोघा नवरा-नवरीचा पारंपरिक लूक लक्षवेधी ठरला.
अशातच आता कौमुदीचा लग्नानंतरचा नवीन लूक समोर आला आहे. यामध्ये कौमुदीने सोनेरी रंगाची सुंदर अशी साडी नेसली आहे. त्यावर तिने लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. त्यावर मॅचिंग अशी लाल रंगाची शालदेखील घेतली आहे. तसेच कौमुदीने खूपच नाजुक व सुंदर असे दागिने घातले आहेत. त्याचप्रमाणे तिच्या पारंपरिक दोन वाट्या असलेल्या मंगळसूत्रानेही अधिक लक्ष वेधून घेतले आहे. कौमुदीची अत्यंत सुंदर व नाजुक अशी हेअरस्टाईल दिसून येत आहे. केसांमध्ये तिने पांढऱ्या रंगाच्या फुलांना पसंती दिली आहे. कौमुदीचा हा साधा लूक खूपच लक्षवेधी ठरला आहे.
त्याचप्रमाणे कौमुदीचा नवरा आकाशनेदेखील पांढऱ्या रंगाची शेरवाणी परिधान केली आहे. त्यावर गळ्यात मोत्याची माळ, मरुन रंगाची शाल व डोक्यावर कौमुदीच्या साडीला मॅच होईल असा फेटा बांधला आहे. दोघंही एकत्रित खूप छान दिसत आहेत. तसेच त्यांच्या लूकची चर्चादेखील सोशल मीडियावर रंगलेली दिसून येत आहे.