शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन, वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 24, 2024 | 8:02 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
film director Shyam Benegal passed away at the age of ९०

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं वयाच्या ९० व्या वर्षी निधन

हिंदी सिनेविश्वाला मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले बेनेगल यांच्यावर मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. वोक्हार्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. स्वत: बेनेगल यांनीही काही दिवसांपूर्वी आपल्या आजारपणाबाबत माहिती देताना नियमितपणे ‘डियलिसिस’ करून घ्यावे असल्याचे सांगितले होते. (Shyam Benegal passed away)

बेनेगल गेल्या काही वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. मात्र गेल्या काही दिवसांत त्यांचा आजार बळावला आणि वोक्हार्ट रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी संध्याकाळी ६.३८ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालविल्याचे पिया बेनेगल यांनी सांगितले. ते ९० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले बेनेगल यांच्यावर मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू होते.

त्यांच्या पश्चात पत्नी निरा आणि मुलगी पिया असा परिवार आहे. बेनेगल यांच्या निधनामुळे कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची मुलगी पिया बेनेगल म्हणाली, ‘ते दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते.’ दोन वर्षांपूर्वी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्यावर डायलिसिसवर उपचार सुरू होते.

आणखी वाचा – Video : कोकणातल्या गावी रमल्या ऐश्वर्या नारकर, चुलीवर काम करण्याचा अभिनेत्रीचा आनंद, साधेपणाचं कौतुक

बेनेगल यांचा जन्म १४  डिसेंबर १९३४ रोजी हैदराबाद येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी अर्थशास्त्रात शिक्षण घेतले. नंतर फोटोग्राफी सुरू केली. त्यांना बॉलीवूडमधील आर्ट सिनेमाचे जनक देखील मानले जाते. ते बारा वर्षांचे असताना त्यांनी त्यांचे फोटोग्राफर वडील श्रीधर बी यांच्यासोबत काम केले. बेनेगल यांनी दिलेल्या कॅमेऱ्यावर पहिला चित्रपट बनवला.

आणखी वाचा – Video : ‘सातव्या मुलीची…’च्या शेवटच्या दिवशी ऐश्वर्या नारकरांसह इतर कलाकार ढसाढसा रडले अन्…; सगळ्यात भावुक व्हिडीओ व्हायरल

अंकूर, निशांत, मंडी, मंथन यासारखे गंभीर विषय असोत की वेलकम टू सज्जनपूर, वेल डन अब्बा असे हलकेफुलके कथानक… दोन्हीही तितक्याच समर्थपणे हाताळताना समांतर चित्रपट मुख्य प्रवाहातही लोकप्रिय करणारे प्रयोगशील दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अचानक निघून जाण्याने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकस्मित निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे

Tags: filmmaker shyam benegal passes awayshyam benegal passed awayshyam benegal passes away
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Bollywood singer Shaan residential building caught in fire on Tuesday midnight.

प्रसिद्ध गायक शान यांच्या इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, नेमकं काय झालं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.